Join us

Onion Market : उमराणे येथे शेतमालाचे लिलाव पूर्ववत; मक्याच्या दरात घसरण तर कांदा दर तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 1:10 PM

दिवाळी (Diwali) सणामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या उमराणे (Umrane) येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी नवीन लाल, उन्हाळी कांदा (Summer Onion) तसेच मका (Maize) विक्रीसाठी शेतकऱ्यांची (Farmers) गर्दी दिसून आली.

दिवाळी सणामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या उमराणे येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी नवीन लाल, उन्हाळी कांदा तसेच मका विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली. कांद्याला ६ हजार रुपये भाव मिळाल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे.

यंदा खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन लाल पावसाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली; मात्र ऐन काढणीच्या उंबरठ्यावर असतानाच परतीच्या पावसामुळे लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी कांदा विक्रीस उशिराने सुरुवात झाली. त्यातच बाजार समित्यांना दिवाळी सणामुळे आठ ते दहा दिवस सुट्टया असल्याने शेतकऱ्यांची कांदा विक्रीसाठी अडचण झाली होती. त्यामुळे बाजार समितीचे कामकाज सुरू होण्याची प्रतीक्षा लागून होती.

● बुधवार (दि.६) रोजी बाजार समितीचे कामकाज सुरू होताच शेतकऱ्यांनी नवीन लाल, उन्हाळी कांदा तसेच मका विक्रीसाठी गर्दी केली होती. बाजारात नवीन लाल कांद्याची ४१० वाहनांमधून सुमारे पाच हजार विचेटल आवक झाली. कांदा किमान २ हजार रुपये, कमाल ५ हजार शंभर रुपये तर सरासरी ४ हजार रुपये दराने विक्री झाला.

● उन्हाळी कांद्याची ३०० वाहनातून ६ हजार क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान २ हजार १०० रुपये, कमाल ६ हजार रुपये तर सरासरी ५ हजार २०० रुपये दराने विक्री झाला. मक्याच्या आवकेतही वाढ होऊन ४१० वाहनांमधून सुमारे ८ हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज आहे. किमान १ हजार ५०० रुपये, कमाल २ हजार ३०० रुपये तर सरासरी २ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने व्यापारी बांधवांनी मका खरेदी केला. दिवाळीनंतर बाजारात लाल कांद्याची आवक अपेक्षित होती.

● अपेक्षित आवक न झाल्याने प पुन्हा उन्हाळी कांद्याच्या मागणीतः वाढ झाल्याने आधी असलेल्या बाजारभावापेक्षा दिवाळीनंतर कांद्याच्या दरात हजार ते दीड हजार रुपयांनी वाढ होऊन कांदा सर्वोच्च ६ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला. लाल कांद्याच्या दरातही पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे; मात्र मक्याच्या दरात दोनशे ते तीनशे रुपये घसरण दिसून आली.

हेही वाचा : Organic Onion Farming : स्वनिर्मित सेंद्रिय निविष्ठेचा वापर करत ज्ञानेश्वरराव घेतात एकरी १५० क्विंटल लाल कांदा

टॅग्स :कांदानाशिकशेतकरीशेतीशेती क्षेत्रबाजारमार्केट यार्ड