मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. ८ हजार पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला ४०१ रुपये उच्चांकी भावाने विकला गेला आहे, अशी माहिती सभापती वसंतराव भालेराव यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजार आवारात आज ८ हजार कांदा पिशव्यांची आवक झाली. मे. थोरात आणि कंपनी आडतदार सागर थोरात यांच्या आडत गाळ्यावर चांडोली बुद्रुक येथील शेतकरी सुप्रिया गोरक्ष थोरात यांच्या कांद्याला दहा किलोस ४०१ रुपये असा आतापर्यंतचा उच्चांकी बाजारभाव मिळाला असल्याचे उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.
कांद्याचे दहा किलोचे दर पुढीलप्रमाणे : सुपर लॉट १ नंबर गोळा कांद्यास ३५१ ते ४०१ रुपये, सुपर गोळे कांदे १ नंबर २८० ते ३३० रुपये, सुपर मिडीयम २ नंबर कांद्यास २५० ते २९० रुपये, गोल्टी कांद्यास १७० ते २५० रुपये, बदला कांद्यास १३० ते २०० रुपये असा बाजारभाव मिळाला.
अधिक वाचा: Tomato Market Narayangaon नारायणगाव बाजारात टोमॅटोला मिळतोय उच्चांकी दर, एका कॅरेटला मिळाला इतका भाव