सोपान भगत
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (दि. १९) झालेल्या लिलावात एक-दोन वक्कलसाठी ५ हजार रुपयांचा भाव मिळाला, तर सरासरी चार हजार ते ४ हजार ३०० तीनशे रुपये भाव मिळाला. नवीन लाल कांद्याला चार हजार पाचशे रुपये भाव मिळाला. सरासरी गावरान कांद्याला चार हजार ते चार हजार पाचशे रुपये भाव मिळाला.
घोडेगाव उपबाजारात मागील आठवड्याच्या गावरान कांद्याला दोनशे ते तीनशे रुपये भाववाढ झाली आहे. लाल कांद्याची आवक वाढत असल्याने दर स्थिर राहिले आहेत. शनिवारी बाजार समितीत एकूण २१ हजार ४३१ कांदा गोण्यांची आवक झाली होती. लिलावात एक दोन लॉट प्रतिक्विंटल पाच हजार मोठा कांदा ४,१०० ते ४,७००, मुक्कल भारी ४,००० ते ४,३०० गोल्टी ४,००० ते ४,२००, जोड कांदा १,५०० ते ३,५०० रुपये असा भाव मिळाला.
नवीन लाल वाळलेल्या सुक्या कांद्याला चार हजार पाचशे रुपये भाव मिळाला. सरासरी तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये भाव मिळाला, असे घोडेगाव येथील कांदा आडतदार बबनराव बेलेकर यांनी सांगितले.
कांद्याचे भाव हे साधारण एक महिनाभर स्थिर राहतील, अशी परिस्थिती आहे, परंतू वातावरण चांगले राहिल्यास व पाऊस कमी झाल्यास नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येणार आहे, एक महिन्यानंतर मात्र कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. - बबनराव बेल्हेकर, कांदा आडतदार, घोडेगाव.