Join us

Onion Market Price: लासलगाव, पिंपळगाव बाजारात आज कांद्याला किती भाव मिळाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 1:56 PM

Today's Onion Market Price: आज दिनांक ४ जुलै २४ रोजी लासलगाव, पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत उन्हाळ कांद्याला किती भाव मिळाला ते जाणून घेऊ.

Today's Onion Market Price:   आज दिनांक ४ जुलै २४ रोजी लासलगाव विंचूर उपबाजार समितीत सकाळच्या सत्रात कांद्याची ७५०० क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कांद्याला कमीत कमी बाजार भाव ११०० रुपये तर सरासरी ३ हजार रुपये प्रति क्विंटल असा मिळाला.

पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत सकाळच्या सत्रात १७ हजार १०० क्विंटल कांदा आवक झाली. कमीत कमी एक हजार रुपये तर सरासरी २९०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.  आज सकाळच्या सत्रात नाशिक जिल्ह्यातील बहुतेक बाजारसमित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव सरासरी २९०० रुपयांच्या दरम्यान प्रति क्विंटल राहिले. या आठवड्यात एनसीसीएफचा कांदा खरेदी दर २८८० रुपये आहे. त्यापेक्षा हे भाव केवळ दहा ते २० रुपयांनी जास्त होते.

कांद्याचे आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

04/07/2024

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---7408250031002800
खेड-चाकण---

400 

नग

200032002500
सातारा---100250030002750
पुणेलोकल11433120032002200
पुणे -पिंपरीलोकल13230030002650
पुणे-मोशीलोकल546120024001800
येवलाउन्हाळी5000130029002750
लासलगाव - विंचूरउन्हाळी7500110031803000
सिन्नर - नायगावउन्हाळी408100031012900
मनमाडउन्हाळी1500138631032900
पिंपळगाव बसवंतउन्हाळी17100110033802900
देवळाउन्हाळी6150120031703000
टॅग्स :कांदाबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती