Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market Price: राष्ट्रीय कांदा दिवसालाच लासलगावी भाव उतरणीला; नाफेडपेक्षाही कमी

Onion Market Price: राष्ट्रीय कांदा दिवसालाच लासलगावी भाव उतरणीला; नाफेडपेक्षाही कमी

Onion Market Price: Lasalgaon onion market price decreased as compared to Nafed | Onion Market Price: राष्ट्रीय कांदा दिवसालाच लासलगावी भाव उतरणीला; नाफेडपेक्षाही कमी

Onion Market Price: राष्ट्रीय कांदा दिवसालाच लासलगावी भाव उतरणीला; नाफेडपेक्षाही कमी

Onion Market Price: आठवड्याच्या सुरूवातीला ३२०० रुपयेपर्यंत प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव असलेला उन्हाळी कांदा कालपासून उतरणीला लागला आहे. नाफेड आणि एनसीसीएफ पेक्षाही आजचे भाव कमी आहेत.

Onion Market Price: आठवड्याच्या सुरूवातीला ३२०० रुपयेपर्यंत प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव असलेला उन्हाळी कांदा कालपासून उतरणीला लागला आहे. नाफेड आणि एनसीसीएफ पेक्षाही आजचे भाव कमी आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

Onion market price on National onion day आज २७ जून रोजी राष्ट्रीय कांदा दिन आहे. मात्र उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळेल या अपेक्षेने आज लासलगाव, पिंपळगाव बसवंत बाजारसमितीतकांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना बाजारभावामुळे अल्प प्रमाणात नाराजीचा सामना करावा लागला.

मागच्या तीन ते चार दिवसांपूर्वी सरासरी ३२०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेले कांद्याचे बाजारभाव कालपासून उतरणीला लागले असून आज लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रातील  लिलावात उन्हाळी कांद्याला सरासरी २९०० रुपये दर मिळाला. पिंपळगाव बाजारसमितीत कांद्याला सरासरी लासलगाव इतकाच म्हणजे २९०० रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला.

एनसीसीएफने या आठवड्यात कांद्याचे खरेदी दर २९४० रुपये प्रति क्विंटल जाहीर केले आहेत.  या दरापेक्षा बाजारसमित्यांमधील दर काहीसे कमी आहेत. नाफेड आणि एनसीसीएफचे दर स्थानिक बाजारपेठेत मिळणाऱ्या दरांप्रमाणेच असल्याने एक वेगळा योगायोग निर्माण झाला आहे. त्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफच्या दराचा बाजारसमित्यांमधील कांदा भावात घसरण होण्यावर परिणाम तर नाही ना झाला? असाही प्रश्न उपस्थित होताना दिसतोय.

नाफेड आणि स्थानिक बाजारसमित्यांमधील कांद्याच्या दराचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. सध्या बाजारभावात जी घसरण आहे, ती कांदा व्यापाऱ्यांना उत्तरेकडील बाजारांत मिळालेल्या कमी भावामुळे असल्याचे समजत आहे. नाफेडच्या खरेदीवर शेतकऱ्यांचा विश्वास नसल्याने त्यांची खरेदीही कमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या किंमतीचा स्थानिक किंमतीवर परिणाम होणे अशक्य आहे.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना

राज्यातील सकाळच्या सत्राचे कांदा लिलाव दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

27/06/2024
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल6818250032002850
खेड-चाकण---क्विंटल400200030002500
पुणेलोकलक्विंटल8282100030002000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2270029002800
पुणे-मोशीलोकलक्विंटल771120025001850
कामठीलोकलक्विंटल6300040003500
कल्याणनं. १क्विंटल3250030002750
येवलाउन्हाळीक्विंटल5000130028652550
लासलगावउन्हाळीक्विंटल3876100031002900
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल6500100032122900
मनमाडउन्हाळीक्विंटल160589031312750
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1710070035602900

Web Title: Onion Market Price: Lasalgaon onion market price decreased as compared to Nafed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.