Join us

धक्कादायक! केवळ आठवडाभरातच कांदा बाजारभाव इतके घसरले; जाणून घ्या आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 2:01 PM

कांदा बाजारभाव घसरतच असून आजचे कांदा बाजारभाव जाणून घेऊया

दिनांक 8 डिसेंबरनंतर केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केली. त्यानंतर सरासरी साडेचार हजार रुपये प्रति किंटल असलेला उन्हाळ कांदा आणि सरासरी 3800 रुपये प्रति क्विंटल असणारा लाल कांदा आता बाजारसमितीत गडगडला आहे. निर्यातबंदीनंतर केवळ तीन आठवड्यात कांद्याची बाजारसमितीतील कमीत कमी किंमत आता हजाराहूनही कमी झालेली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट प्रकल्पातील बाजार माहिती व जोखीम कक्षाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार कांद्याची लासलगाव बाजारातील मागील सप्ताहातील सरासरी किंमत रु.2194 प्रती क्लिटल होत्या. मागील आठवड्याच्या (दिनांक 17 डिसेंबर रोजी संपलेला आठवडा) तुलनेत कांदा किंमतींत तब्बल 39 टक्के घट झाली आहे. दुसरीकडे देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आवक मध्ये 3 टक्केनी घट झाली आहे.

उन्हाळी कांदा आता अत्यल्प- दरम्यान आज सकाळी लासलगावच्या विंचूर उपबाजारसमितीत झालेल्या कांदा लिलावांत लाल कांद्याला कमीत कमी 1 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला, तर सरासरी केवळ 1900 रुपये दर मिळाला.- पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत कमीत कमी 1 हजार रुपये दर मिळाला. उन्हाळी कांद्याची आवक आता बाजारसमित्यांमधून जवळपास घटत चालली असून दिवसाकाठी अवघे दीडशे ते दोनशे क्विटल उन्हाळी कांदा बाजारसमित्यांत दाखल होत आहे.

आज सकाळी झालेल्या लिलावादरम्यान पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत 180 क्विंटल उन्हाळ कांदा दाखल झाला. त्याला अत्यल्प म्हणजे 740 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर सरासरी 1800 रुपये प्रति किटल दर मिळाला.

आज दिनांक 21 डिसेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील सकाळच्या सत्राचे बाजारभाव असे आहेत.

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---12834140024001900
खेड-चाकण---400100024001800
येवलालाल1000040020801800

लासलगाव

- विंचूर

लाल10500100021001900
नागपूरलाल2030160022002050
मनमाडलाल450060019431600
पेनलाल411320034003200
पुणेलोकल1152280030001900
पुणे- खडकीलोकल5250030002750
पुणे-मोशीलोकल98850020001250
कल्याणनं. १3200028002400
नागपूरपांढरा2030160022002050

पिंपळगाव

बसवंत

पोळ13500100025751850
मनमाडउन्हाळी90100120501493
पिंपळगाव बसवंतउन्हाळी18074019001800
टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीबाजार