मागच्या दोन आठवड्यापासून राज्यातील दररोजच्या कांदा आवकेत सरासरी दहा टक्क्यांनी घट होताना दिसत आहे. उन्हाळी कांदाबाजारात यायला अजून अवकाश असल्याने आणि ग्राहकांकडून मागणीही वाढत असल्याने या संपूर्ण आठवड्यात कांद्याचे बाजार स्थिरावलेले दिसून आले. दरम्यान काल राज्यातील अनेक बाजारसमित्यांनी सामुहिकरित्या बंद आंदोलन केले होते. त्यानंतर आज सकाळी बाजारात आलेल्या कांद्याच्या बाजारभावांमध्ये लासलगाव व विंचूर बाजारसमितीत १०० ते २०० रुपयांनी घसरण दिसून आली.
शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी लासलगाव बाजारसमितीत लाल कांद्याला सरासरी १८०० रुपये प्रति क्विंटलचा भाव होता. दुसऱ्या दिवशी रविवारची सुटी आणि त्यानंतर सोमवारी झालेला संप, अशा दोन दिवसांच्या खंडानंतर आज सकाळी लासगलगाव बाजारसमितीत सकाळच्या सत्रात झालेल्या कांदा लिलावांना सरासरी १६५० रुपये बाजारभाव (onion market rates) मिळाला.
सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारसमितीत ९ हजार ३५०, तर शेजारी असलेल्या विंचूर उपबाजार समितीत १२ हजार ५०० क्विंटल कांदा आवक झाली. विंचूर बाजारसमितीत कांद्याला सरासरी १७५१ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
दरम्यान राज्यातील प्रमुख बाजारांतील कांदा बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत.
बाजार समिती | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
मुंबई - कांदा बटाटा मार्केट | --- | 8707 | 1700 | 2300 | 2000 |
खेड-चाकण | --- | 350 | 1600 | 2000 | 1800 |
लासलगाव | लाल | 9350 | 600 | 1841 | 1650 |
लासलगाव - विंचूर | लाल | 12500 | 750 | 1901 | 1751 |
मनमाड | लाल | 5000 | 500 | 1781 | 1500 |
सांगली - फळे भाजीपाला | लोकल | 5166 | 400 | 2300 | 1350 |
पुणे | लोकल | 26264 | 700 | 2100 | 1400 |
पुणे- खडकी | लोकल | 16 | 800 | 1400 | 1100 |
पुणे -पिंपरी | लोकल | 6 | 2000 | 2000 | 2000 |