Join us

Onion Market : उन्हाळ कांदा घसरला, आज कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 6:45 PM

राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत कांद्याची एक लाख 69 हजार 984 क्विंटलची आवक झाली

राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत कांद्याची एक लाख 69 हजार 984 क्विंटल ची आवक झाली. आज सर्वाधिक 87 हजार क्विंटलची उन्हाळ कांद्याची आवक झाल्याचे दिसून आले तर आज लाल कांद्याला सरासरी 1200 रुपये ते 1600 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर हिंगणा बाजार समितीत असलेला दोन हजार रुपयांच्या दरात घसरण होऊन 1800 रुपयांचा दर मिळाला आहे.

आज 17 मे 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला सरासरी एक हजार रुपयांपासून ते 1700 रुपये पर्यंत दर मिळाला मुंबई कांदा बटाटा मार्केट आणि दौड केडगाव या बाजार समितीमध्ये सर्वाधिक दर मिळाल्याचे दिसून आले. त्यानंतर सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याची 17 हजार क्विंटळून अधिकची आवक झाली तर या बाजार समितीत सरासरी 1350 रुपयांचा दर मिळाला. तर आज लोकल कांद्याला सरासरी 1000 रुपयांपासून 1400 रुपयांपर्यंत दर मिळाला तर एकट्या कामठी बाजार समिती सर्वाधिक 02 हजार रुपयांचा दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याला काय दर मिळाला?

आज येवला बाजार समितीत 6000 क्विंटल ची कांद्याची आवक झाली या बाजार समितीत 1450 रुपये दर मिळाला. त्यानंतर नाशिक बाजार समितीत 1200 रुपये, लासलगाव बाजार समिती 1400 रुपये, लासलगाव निफाड बाजार समिती 1500 रुपये, पैठण बाजार समितीत 1200 रुपये, संगमनेर बाजार समितीत 1225 रुपये, सटाणा बाजार समितीत 1610 रुपये तर देवळा बाजार समिती 1500 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत आजचे सविस्तर दर

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/05/2024
अहमदनगर---क्विंटल335130021001500
अहमदनगरलालक्विंटल293216001200
अहमदनगरउन्हाळीक्विंटल1135520022511225
अकोला---क्विंटल69570016001200
अमरावतीलोकलक्विंटल60950015001000
चंद्रपुर---क्विंटल418100017001500
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल149030016501200
धुळेलालक्विंटल414545015631305
जळगावलालक्विंटल197875014751125
कोल्हापूर---क्विंटल356760023001400
मंबई---क्विंटल11960140020001700
नागपूरलोकलक्विंटल48150025002000
नागपूरलालक्विंटल3160020001800
नाशिकउन्हाळीक्विंटल7658946118231472
पुणे---क्विंटल484570023001700
पुणेलोकलक्विंटल1605577516001188
पुणेचिंचवडक्विंटल11397100023101600
सांगलीलोकलक्विंटल333870020501375
सोलापूर---क्विंटल30520018001000
सोलापूरलोकलक्विंटल11230017001200
सोलापूरलालक्विंटल1742810025001350
ठाणेनं. १क्विंटल3150020001650
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)169984
टॅग्स :कांदानाशिकमार्केट यार्डशेती क्षेत्र