Join us

Onion Market : लालसह उन्हाळ कांदा घसरला, कोणत्या बाजार समितीत सर्वाधिक भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 5:59 PM

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये लाल आणि उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, हे सविस्तर पाहुयात..

मागील दोन तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला समाधानकारक भाव मिळत होता. मात्र आज सकाळच्या सत्रातील बाजारभाव पाहिले असता दर घसरल्याचे दिसून आले. तर आजच्या बाजार अहवालानुसार लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला 1700 रुपये दर मिळाला. यानुसार आज 80 रुपयांनी दर घसरले आहेत. 

आज 13 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार अहमदनगर, नाशिक, सोलापूर, पुणे, मुंबई बाजार समित्यांसह इतर बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक कांद्याची आवक झाली.  आजच्या दिवसातील सर्वाधिक 34 हजार 494 क्विंटलची आवक सोलापूर बाजार समितीत झाली. जवळपास सायंकाळी पाच वाजेपर्यंत पावणे दोन लाख क्विंटल कांद्याची आवक झाली.  तर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 68 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. 

राज्यातील निवडक बाजार समित्या बाजारभाव 

आज लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याचा बाजारभाव घसरला असला तरीही राज्यातील सर्वाधिक 1700 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. मात्र कामठी बाजार समितीत लोकल कांद्याला आजच्या दिवसातील सर्वाधिक सरासरी 2000 रुपयांचा भाव मिळाला आहे. तर दुसऱ्या बाजूला कल्याण बाजार समितीमध्ये नंबर एकच्या कांद्याला सरासरी 1850 रुपये बाजारभाव मिळाला. तर आज संगमनेर बाजार समितीत लाल कांद्याला सर्वात कमी म्हणजेच केवळ 850 रुपये दर मिळाला.

उन्हाळ कांद्याचा बाजारभाव 

आज लासलगाव, कळवण, संगमनेर, पिंपळगाव बसवंत, रामटेक, देवळा, अहमदनगर, नेवासा घोडगाव, दिंडोरीवणी, पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक झाली. आज सर्वाधिक उन्हाळ कांद्याची आवक अहमदनगर बाजार समितीत झाली. आज उन्हाळ कांद्याला सर्वाधिक 1650 रुपयांचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये मिळाला. मात्र कालच्या तुलनेत इथेही घसरण झाली आहे. नागपूर बाजार समितीत पांढऱ्या कांद्याची आवक झाली. पांढऱ्या कांद्याला सरासरी 1750 रुपये दर मिळाला.

असे आहेत आजचे दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/03/2024
अकलुज---क्विंटल35530021001200
कोल्हापूर---क्विंटल748960020001300
अकोला---क्विंटल1005120020001600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल177470020001350
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल17166120017001450
सातारा---क्विंटल204100017001350
हिंगणा---क्विंटल3180018001800
सोलापूरलालक्विंटल3449420021001200
येवलालालक्विंटल1400050017261600
येवला -आंदरसूललालक्विंटल400030016411525
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल60970018001250
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1030070018001650
जळगावलालक्विंटल127160016001202
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1200075016001500
नागपूरलालक्विंटल2000120018001650
सिन्नर - नायगावलालक्विंटल28050017111550
संगमनेरलालक्विंटल10221501600875
मनमाडलालक्विंटल300040016351500
सटाणालालक्विंटल715020015901335
कोपरगावलालक्विंटल220050017251550
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल234060018001600
भुसावळलालक्विंटल33100015001200
यावललालक्विंटल6508201190960
देवळालालक्विंटल250035016651550
उमराणेलालक्विंटल1150065117501500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल528930019001100
पुणेलोकलक्विंटल1743560018001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11140016001500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2700120015921350
कामठीलोकलक्विंटल43150025002000
कल्याणनं. १क्विंटल3170020001850
नागपूरपांढराक्विंटल1500130019001750
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल800050018991750
संगमनेरउन्हाळीक्विंटल911220020611130
कोपरगावउन्हाळीक्विंटल340050017841570
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल885540019001600
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3000120018441650
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2000100017201550
पारनेरउन्हाळीक्विंटल2168830020001350
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल4487120021311611
देवळाउन्हाळीक्विंटल105080016051500
टॅग्स :शेतीकांदामार्केट यार्डनाशिकराहुल गांधी