राज्यात कांद्याच्या भावात सतत पडझड होत असताना आज सकाळच्या सत्रात राज्यात ३९ हजार ७२२ क्विंटल कांद्याची आवक झाली. दरम्यान, आज दिनांक १३ फेब्रुवारी रोजी क्विंटलमागे शेतकऱ्यांना सर्वसाधारण १००० ते १२०० रुपये भाव मिळत आहे.
नाशिकमध्ये लाल कांद्याला कमीत कमी ३०० रुपये एवढाच भाव मिळत असून सर्वसाधारण ११५० रुपये दर मिळत आहे.
पुणे बाजारसमितीत लोकल जातीच्या कांद्याला सर्वसाधारण १००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर अमरावती बाजारसमितीत लाल कांद्याचा भाव १२०० रुपये क्विंटल एवढा होता.
जाणून घ्या भाव..
जिल्हा | आवक | कमीत कमी दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|
अमरावती | 579 | 400 | 1200 |
मंबई | 9292 | 900 | 1300 |
नाशिक | 2500 | 300 | 1050 |
नाशिक | 14000 | 300 | 1150 |
पुणे | 1775 | 300 | 1100 |
पुणे | 11573 | 700 | 1000 |
ठाणे | 3 | 1200 | 1600 |