Join us

Onion Market Today: लासलगाव- विंचूर बाजारसमितीत उन्हाळी कांद्याला क्विंटलमागे एवढा मिळतोय भाव, उर्वरित बाजारसमितींमध्ये..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 3:02 PM

Onion Market Maharashtra: उन्हाळी कांद्याला असा मिळतोय बाजारभाव..

राज्यात कांद्याला क्विंटलमागे १७०० ते ३००० रुपयांचा भाव मिळत असून उन्हाळी कांद्याला लासलगाव- विंचूर बाजारसमितीत २४०० रुपयांचा भाव मिळाला आहे. आज या बाजारसमितीत ८५०० क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली.

सिन्नर- नायगाव बाजारसमितीत उन्हाळी कांद्याची ३१६ क्विंटल आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना क्विंटलमागे सर्वसाधारण २४०० रुपयांचा भाव मिळत असून जास्तीत जास्त २६०० रुपयांचा बाजारभाव मिळत आहे.

आज पुण्यात ८८५३ क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. यावेळी २०६७ रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. सोलापूरात लाल कांद्याची ८८१९ क्विंटल आवक झाली. क्विंटलमागे २४०० ते ३००० रुपयांचा भाव मिळत आहे.

नाशिकमध्ये आज एकूण २९२१६ क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली असून क्विंटलमागे २३९० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला.

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/06/2024
कोल्हापूर---413970028001800
मंबई---8608210029002500
नागपूरलोकल25250035003000
नाशिकउन्हाळी2921674026462390
पुणे---225200030002500
पुणेलोकल8853140027332067
सांगलीलोकल226990028001850
सातारा---310100032002100
सोलापूरलोकल16130030003000
सोलापूरलाल881950035002400
ठाणेनं. १3280030002900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)62483

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्ड