Join us

Onion Market: लासलगाव, विंचूरसह उर्वरित बाजारसमितींमध्ये कांद्याला काय मिळाला बाजारभाव?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 18, 2024 4:17 PM

उन्हाळ कांद्यासह लाल, पांढऱ्या कांद्याला राज्यात काय भाव मिळाला?

आज राज्यातील बाजार समितीमध्ये दुपारी ३ च्या सुमारास कांद्याची जवळपास 51 हजार 403  क्विंटलची आवक झाली. काल श्रीरामनवमी असल्याने बहुतांश बाजार समित्या बंद होत्या परिणामी कांदा आवक घटल्याचे दिसून आले. आज कांद्याला सरासरी 1000 रुपयापासून ते 1500 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 18 एप्रिल 2024 च्या पणन मंडळाच्या माहितीनुसार राज्यात उन्हाळ कांद्यासह लाल, पांढरा, हालवा, नं १ व लोकल कांद्याची आवक झाली. उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 55 हजार क्विंटलची आवक झाली. नाशिक जिल्ह्यात 30 हजार क्विंटलची आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1000 रुपये ते 1300 रुपये दर मिळाला. लासलगाव निफाड मध्ये कांद्याला १४०० रुपये तर विंचूर बाजारसमितीत १३७५ रुपये भाव मिळाला. बारामती आणि भुसावळ बाजार समितीत लाल कांद्याची आवक झाली. अनुक्रमे बारामती बाजार समितीत सरासरी 1000 रुपये तर भुसावळ बाजार समितीत 1200 रुपये दर मिळाला. 

सांगली बाजारसमितीत लोकल कांद्याला सरासरी ११८८ रुपये तर पुणे बाजार समितीत सरासरी १०१७ रुपये दर मिळाला. नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी १३७५ रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/04/2024
छत्रपती संभाजीनगर---27374001300850
धुळेलाल86510013701200
जळगावलोकल3200110013001200
जळगावलाल156872514531139
जालना---61520016001000
कोल्हापूर---345060017001200
मंबई---6382100015001250
नागपूरलाल2860100016001450
नागपूरपांढरा2000120016001500
नाशिकउन्हाळी1080060015001375
पुणे---125100015001300
पुणेलोकल1303256714671017
सांगलीलोकल315260016251188
सातारा---445100015001250
साताराहालवा15050012001200
सोलापूरलोकल1940013001120
ठाणेनं. १3130015001400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)51403
टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डनाशिक