Join us

Onion Market : नरक चतुर्दशीला राज्यात काय आहे कांदा बाजारभाव; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 6:08 PM

दिवाळीमुळे (Diwali) महाराष्ट्रात विविध बाजार समित्यांमध्ये खरेदी बंद आहे. तरीही, काही बाजार समित्यांमध्ये खरेदी सुरू आहे. ज्यात आज गुरुवारी (दि.३१) रोजी राज्यातील दोन प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Onion) आवक दिसून आली.

दिवाळीमुळे महाराष्ट्रात विविध बाजार समित्यांमध्ये खरेदी बंद आहे. तरीही, काही बाजार समित्यांमध्ये खरेदी सुरू आहे. ज्यात आज गुरुवारी (दि.३१) रोजी राज्यातील दोन प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक दिसून आली. छत्रपती संभाजीनगर येथे २८० क्विंटल तर पुण्यात ७४३४ क्विंटल कांदा दाखल झाला होता.

छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला कमीत कमी २०० रुपये आणि सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पुण्यात लोकल कांद्याला कमीतकमी २००० रुपये तर सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कालच्या तुलनेत पुणे येथे आज १४८८ क्विंटल कमी आवक तर सरासरी २०० रुपयांनी अधिक दर होता. तर छत्रपती संभाजीनगर येथे कालच्या तुलनेत २०० क्विंटलने आवक कमी आणि सरासरी ३५० रुपये प्रती क्विंटल अधिक दर होता. 

याव्यतिरिक्त कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्याच्या इतर बाजार समित्यांमध्ये आज कांद्याची आवक झालेली नाही. सध्या दिवाळीच्या कारणामुळे कर्मचारी, हमाल, मापडी आदी सुट्टीवर असल्याने राज्यातील अनेक बाजार समित्या बंद आहेत. तर  किरकोळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे सर्वच भाजीपाल्यांचे दर कडाडले असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा :  Success Story : डाळबट्टी पिठातून उभारला शेती प्रक्रिया उद्योग; पळसगावचा प्रदीप करतोय वार्षिक ५० लाखांची उलाढाल

टॅग्स :मार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारशेती क्षेत्रशेतकरीशेतीकांदापुणेछत्रपती संभाजीनगर