Lokmat Agro >बाजारहाट > Onion Price : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राज्यभरातील कांद्याला किती मिळाला दर?

Onion Price : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राज्यभरातील कांद्याला किती मिळाला दर?

Onion Price: How much did onions get across the state on Independence Day? | Onion Price : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राज्यभरातील कांद्याला किती मिळाला दर?

Onion Price : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राज्यभरातील कांद्याला किती मिळाला दर?

Onion Price : महाराष्ट्र राज्याच्या कृषी पणन मंडळाच्या अद्ययावत माहितीच्या आधारे आज केवळ चार बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली होती.

Onion Price : महाराष्ट्र राज्याच्या कृषी पणन मंडळाच्या अद्ययावत माहितीच्या आधारे आज केवळ चार बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली होती.

शेअर :

Join us
Join usNext

Onion Price Today : आज स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीमुळे राज्यातील बहुतांश बाजार समित्याने लिलाव बंद ठेवले होते. तर महाराष्ट्र राज्याच्या कृषी पणन मंडळाच्या अद्ययावत माहितीच्या आधारे आज केवळ चार बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली होती. त्यामध्ये भुसावळ, पुणे-पिंपरी, शेवगाव आणि राहुरी-वांबोरी या बाजार समित्यांचा सामावेश आहे. तर आज लाल, लोकल, उन्हाळी आणि नं.१, नं.२ आणि नं.३ कांद्याची आवक या बाजार समित्यांमध्ये झाली होती. 

दरम्यान, आजच्या कांद्याला मिळालेल्या सविस्तर दराचा विचार केला तर आद १ हजार ६५० ते ३ हजार ६०० रूपयांपर्यंत कांद्याला दर मिळाला आहे. पिंपरी बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त मध्ये ३ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. येथे लोकल १२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर शेवगाव येथे आवक झालेल्या ४९८ क्विंटल नं.३ कांद्याला केवळ १ हजार ६५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

राज्यातील राहुरी वांबोरी बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सर्वांत जास्त म्हणजे ५ हजार ३७६ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर याच बाजार समितीमध्ये ५०० रूपये प्रतिक्विंटल किमान दर मिळाला. हा राज्यातील सर्वांत कमी किमान दर होता. पिंपरी आणि शेवगाव बाजार समितीमध्ये ३ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल कमाल दर मिळाला.

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/08/2024
भुसावळलालक्विंटल2300032003200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल12350037003600
शेवगावनं. १क्विंटल830300037003350
शेवगावनं. २क्विंटल660220028002550
शेवगावनं. ३क्विंटल498100020001650
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल537650035003000

Web Title: Onion Price: How much did onions get across the state on Independence Day?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.