Onion Price Today : आज स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीमुळे राज्यातील बहुतांश बाजार समित्याने लिलाव बंद ठेवले होते. तर महाराष्ट्र राज्याच्या कृषी पणन मंडळाच्या अद्ययावत माहितीच्या आधारे आज केवळ चार बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली होती. त्यामध्ये भुसावळ, पुणे-पिंपरी, शेवगाव आणि राहुरी-वांबोरी या बाजार समित्यांचा सामावेश आहे. तर आज लाल, लोकल, उन्हाळी आणि नं.१, नं.२ आणि नं.३ कांद्याची आवक या बाजार समित्यांमध्ये झाली होती.
दरम्यान, आजच्या कांद्याला मिळालेल्या सविस्तर दराचा विचार केला तर आद १ हजार ६५० ते ३ हजार ६०० रूपयांपर्यंत कांद्याला दर मिळाला आहे. पिंपरी बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त मध्ये ३ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. येथे लोकल १२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर शेवगाव येथे आवक झालेल्या ४९८ क्विंटल नं.३ कांद्याला केवळ १ हजार ६५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.
राज्यातील राहुरी वांबोरी बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सर्वांत जास्त म्हणजे ५ हजार ३७६ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर याच बाजार समितीमध्ये ५०० रूपये प्रतिक्विंटल किमान दर मिळाला. हा राज्यातील सर्वांत कमी किमान दर होता. पिंपरी आणि शेवगाव बाजार समितीमध्ये ३ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल कमाल दर मिळाला.
आजचे कांद्याचे सविस्तर दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
15/08/2024 | ||||||
भुसावळ | लाल | क्विंटल | 2 | 3000 | 3200 | 3200 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 12 | 3500 | 3700 | 3600 |
शेवगाव | नं. १ | क्विंटल | 830 | 3000 | 3700 | 3350 |
शेवगाव | नं. २ | क्विंटल | 660 | 2200 | 2800 | 2550 |
शेवगाव | नं. ३ | क्विंटल | 498 | 1000 | 2000 | 1650 |
राहूरी -वांबोरी | उन्हाळी | क्विंटल | 5376 | 500 | 3500 | 3000 |