Join us

Onion Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज लासलगावला कांदा बाजार भाव वाढले की पडले? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 4:40 PM

Onion Market Price: आज आठवड्याच्या पहिल्यास दिवशी लासलगाव, पिंपळगाव बसवंतसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांतील कांदा बाजारभाव जाणून घेऊ.

Onion market prices for today is higher than nccf declared prices या आठवड्याचे एनसीसीएफ आणि नाफेडचा कांदा खरेदी दर जाहीर झाला असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी तो समान म्हणजेच २८८० रुपये इतका आहे. आज सोमवार दिनांक १ जुलैपासून रविवारपर्यंत म्हणजेच ७ जुलैपर्यंत हाच खरेदीदर राज्यात असेल.

दरम्यान मागच्या आठवड्याच्या तुलनेत लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजारसमितीतील कांद्याचे बाजार भाव आज किंचितसे वधारलेले दिसून आले. मागच्या आठवड्यात लासलगाव बाजारसमितीत कांद्याल सरासरी बाजारभाव २९०० रुपये प्रति क्विंटल असे होते. या आठवड्यात पहिल्याच दिवशी ते सरासरी ३ हजारापर्यंत आले आहेत. म्हणजे साधारणत: ५० ते १०० रुपयांनी वधारल्याचे दिसून आले.

आज दिनांक १ जुलै २४ रोजी लासलगाव-विंचूर उप बाजारसमितीत सकाळच्या सत्रात कांद्याची ६ हजार ५०० क्विंटल आवक झाली. उन्हाळी कांद्याला कमीत कमी बाजारभाव १२००, तर सरासरी ३ हजार रुपये प्रति क्विंटल असे होते.

पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत आज उन्हाळी कांद्याीच १४ हजार ४०० क्विंटल आवक झाली. सरासरी बाजारभाव ३१०० रुपये प्रति क्विंटल असे राहिले.

असे असले तर जिल्ह्यातील येवला, मनमाड चांदवड बाजारसमित्यांमध्ये लासलगाव-पिंपळगावपेक्षा कमी बाजारभाव राहिले.

लासलगाव बाजारसमितीत नाफेड-एनसीसीएफने जाहीर केलेल्या बाजार भावापेक्षा सरासरी बाजारभाव जास्त राहिले, तर इतर बाजार समित्यांमध्ये कमी राहिले.

राज्यातील प्रमुख बाजारांतील कांदा बाजारभाव (रु./ क्विंटल)

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

01/07/2024
कोल्हापूर---2139100033002200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---8172240032002800
सातारा---45250030002750
कराडहालवा99100030003000
बारामतीलाल45667028002100
जळगावलाल74677728151790
नागपूरलाल2220200030002750

अमरावती-

फळ आणि भाजीपाला

लोकल349280032003000

सांगली -

फळे भाजीपाला

लोकल1566100032002100
पुणेलोकल2513100030002000
पुणे-मोशीलोकल417140025001950

चाळीसगाव-

नागदरोड

लोकल1400255029512700
वाईलोकल350150029002400
मंगळवेढालोकल146121030202820
कामठीलोकल7300040003500
कल्याणनं. १3250028002650
नागपूरपांढरा1000270032003075
येवलाउन्हाळी5000150030162750
येवला -आंदरसूलउन्हाळी3000147530602700
लासलगाव - विंचूरउन्हाळी6500120032003000
मालेगाव-मुंगसेउन्हाळी10000100032012950
सिन्नर - नायगावउन्हाळी557100031913000
कळवणउन्हाळी1330090032552750
चांदवडउन्हाळी5000170130012250
मनमाडउन्हाळी1000130029522700
पिंपळगाव बसवंतउन्हाळी14400100034003100
दिंडोरीउन्हाळी285250031602900
दिंडोरी-वणीउन्हाळी4544270034503065
वैजापूरउन्हाळी76090031002500
देवळाउन्हाळी515592532053025
टॅग्स :कांदाबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती