Join us

कांदा दरात घसरण सुरूच! आजचे कांदा बाजारभाव काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 3:41 PM

कांदा बाजारभावाने शेतकऱ्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाल कांद्याला सरासरी 3 हजार रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला ...

कांदा बाजारभावाने शेतकऱ्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाल कांद्याला सरासरी 3 हजार रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला होता. मात्र किरकोळ बाजारात कांदा भाव वाढताच केंद्राने निर्यातबंदीचा निर्णय घेतला अन् बाजारात कांदा कोसळला. आज पंधरा दिवसांनंतर कांदा बाजारभाव निम्म्यावर आले असून निम्म्या दराने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

दरम्यान आज २६ डिसेंबर रोजी नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटलमागे सरासरी 1500 रुपये इतका दर मिळाला. तर पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल मागे सरासरी 1301 इतका दर मिळाला. म्हणजेच कालच्या बाजारभावापेक्षा आज दोन्ही कांद्याचा बाजारभाव दोनशे ते तीनशे रुपयांनी पुन्हा घसरल्याचे दिसून आले. लासलगाव बाजारसमितीमध्ये आज लाल कांद्याची 5488 क्विंटल आवक झाली. त्यात या कांद्याला कमीत कमी 600 रुपये दर मिळाला. तर जास्तीत जास्त 1500 रुपये दर मिळाला. येवला अंदरसूल बाजार समितीत लाल कांद्याची 6000 क्विंटल आवक झाली. यावेळी कमीत कमी 300 इतका दर मिळाला. सरासरी 1350 इतका दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजारसमितीमध्ये उन्हाळी कांद्याची 86    क्विंटल इतकी आवक झाली. तर कमीत कमी 725 इतका दर मिळाला. तर सरासरी 1301 मिळाला. 

राज्यातील आजचे कांदा बाजारभाव पाहुयात 

 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/12/2023
कोल्हापूर---क्विंटल537050030001500
अकोला---क्विंटल800100022001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल13392501700900
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11545150025002000
खेड-चाकण---क्विंटल400100021001800
सातारा---क्विंटल192150035002500
येवला -आंदरसूललालक्विंटल600030014611350
लासलगावलालक्विंटल548860015931500
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1100070016751550
सिन्नर - नायगावलालक्विंटल476100016951525
मनमाडलालक्विंटल350050016811500
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल345192515001400
भुसावळलालक्विंटल42100015001200
पुणेलोकलक्विंटल1146880030001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10160020001800
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल900100016001250
कामठीलोकलक्विंटल5250035003000
कल्याणनं. १क्विंटल3160026002100
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1035160118611551
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल8672515451301
टॅग्स :नाशिकशेतीमार्केट यार्डकांदा