Lokmat Agro >बाजारहाट > चाकण बाजारात कांद्याच्या भावात घट पालेभाज्यांचे भाव कडाडले

चाकण बाजारात कांद्याच्या भावात घट पालेभाज्यांचे भाव कडाडले

Onion prices drop in Chakan market, tomato prices increased | चाकण बाजारात कांद्याच्या भावात घट पालेभाज्यांचे भाव कडाडले

चाकण बाजारात कांद्याच्या भावात घट पालेभाज्यांचे भाव कडाडले

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक दुपटीने घटूनही भावात १०० रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव १,७०० रुपयांवरून १,६०० रुपयांवर स्थिरावला.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक दुपटीने घटूनही भावात १०० रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव १,७०० रुपयांवरून १,६०० रुपयांवर स्थिरावला.

शेअर :

Join us
Join usNext

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये डांगर भोपळ्यासह हिरवी मिरची व पालेभाज्यांची भरपूर आवक झाली. गुजरातहून दाखल झालेला पडवळ व पालेभाज्यांचेही भाव कडाडले आहेत. जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल व म्हैस यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. एकूण उलाढाल ३ कोटी ९० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक दुपटीने घटूनही भावात १०० रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव १,७०० रुपयांवरून १,६०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक २,२५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १,१५० क्विंटलने वाढूनही भावात २०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव २,००० रुपयांवरून २,२०० रुपयांवर पोहोचला. 

लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ३ क्विंटलने घटल्याने भावात तीन हजार रुपयांची वाढ झाली. लसणाचा कमाल भाव १० हजार रुपयांवरून १३ हजार रुपयांवर पोहोचला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ११२ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ७ हजार रुपयांपासून ९ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

टोमॅटो तेजीत
फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रती दहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात :
टोमॅटो - १५२ क्विटल [ ६,००० ते १,००० रु.), कोबी २२० क्विटल [ ५०० ते ७०० रु.), फ्लॉवर- १९७ विचटल ( ६०० ते ९०० रु.), वांगी- ८३ ३ क्विंटल (१,००० ते २,००० रु.), भेंडी - १३५ क्विटल (२,००० ते ४,००० रु.), दोडका ६३ क्विंटल (३,००० ते ४,००० रु.), कारली- ६९ क्विटल (२,००० ते ३,००० रु.), दुधीभोपळा - ६२ २ क्विटल (१,००० ते २,००० रु.). काकडी - ७४ क्विंटल (२.०० ते ३,००० रु.), क्विटल क्विटल ( २,००० ते ३,००० रु.), वालवड - ६३ 2 रुपये), गवार- २,५०० गवार - १४ क्विंटल । ७,००० ते १,००० रु.), ढोबळी मिरची - १३६ क्विटल (२,००० ते ३,००० रु.), चवळी - - २४ फरशी ६९ (१,५०० ते क्विटल [२,००० ते ३,००० रुपये.), वाटाणा - ५५ क्विंटल [ ५,००० ते ७,००० रु.), शेवगा - ३० क्विटल (२,००० ते ३,००० रुपये), गाजर - १३० क्विटल [२,००० ते ३,००० रु.).

जनावरे :
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ३८ जर्शी गाईपैकी २९ गाईची विक्री झाली. (१५,००० ते १,००,००० रुपये,], ८२ बैलांपैकी ५४ बैलांची विक्री झाली (१५,००० ते ६०,०० रुपये ), १०७ म्हशींपैकी ९३ म्हशींची विक्री झाली. (३०,००० ते ८०,००० रुपये,], ९,९५० शेळ्या- मेंढ्यापैकी ९.५८० शेळ्यांची विक्री (२,००० ते २५,००० रुपये,]..

शेतीमालाची आवक व बाजारभाव :
कांदा : एकूण आवक १,५०० क्विटल भाव क्रमांक १. १,६०० रुपये, भाव क्रमांक २. १,३०० रुपये, भाव क्रमांक ३.१,००० रुपये.
बटाटा : टाटा एकूण आवक- २,२५० क्विंटल भाव क्रमांक १. २,२०० रुपये, भाव क्रमांक २.१,८०० रुपये, भाव क्रमांक ३. १,५०० रुपये.

पालेभाज्या : चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी : एकूण ९ हजार ५०० ते जुड्या ( १,००० ते २,००० रुपये,], कोथिंबीर : एकूण २८ हजार ९५० जुड्या ( ५०० ते १,५०० रुपये), शेपू : एकूण ३ हजार, ५५० जुड्या (८०० ते १,२०० रुपये [), पालक : एकूण ४ हजार २६० जुड्या [ ४०० ते ६०० रुपये).

Web Title: Onion prices drop in Chakan market, tomato prices increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.