Lokmat Agro >बाजारहाट > Onion Rates : आर्थिक वर्षाचा शेवटी कांद्याचा किमान दर - १५० रूपये प्रतिक्विंटल! जाणून घ्या राज्यातले दर

Onion Rates : आर्थिक वर्षाचा शेवटी कांद्याचा किमान दर - १५० रूपये प्रतिक्विंटल! जाणून घ्या राज्यातले दर

Onion Rates How much onion rate end of financial year 150 rs per quintle | Onion Rates : आर्थिक वर्षाचा शेवटी कांद्याचा किमान दर - १५० रूपये प्रतिक्विंटल! जाणून घ्या राज्यातले दर

Onion Rates : आर्थिक वर्षाचा शेवटी कांद्याचा किमान दर - १५० रूपये प्रतिक्विंटल! जाणून घ्या राज्यातले दर

राज्यभरातील कांद्याचे दर जाणून घ्या...

राज्यभरातील कांद्याचे दर जाणून घ्या...

शेअर :

Join us
Join usNext

यंदाचं आर्थिक वर्ष सरत आलंय तरीही कांद्याच्या दराने काही उचल खाल्ली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. केंद्र सरकारने ३१ मार्चपर्यंत असलेली कांदा निर्यातबंदीवरील मुदत आणखी वाढवल्याने कांद्याचे दर वाढण्याची शक्यता धूसर झाली आहे. तर मार्चअखेरच्या दोन दिवसांतही कांद्याचे दर हजार ते दीड हजारांच्या दरम्यानच आहेत. 

दरम्यान, आज हालवा, लाल, लोकल, पांढरा, उन्हाळी यां कांद्याची आवक झाली होती. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सिन्नर-नायगाव, नागपूर, सांगली, जामखेड, निफाड, विंचूर या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. तर विंचूर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ७ हजार २३६ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. 

आजच्या दिवसातील सर्वांत कमी दराचा विचार केला तर जामखेड बाजार समितीमध्ये आज ९२५ रूपये सरासरी दर मिळाला असून येथे १५० रूपये प्रतिक्विंटल किमान दर होता. तर कराड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी प्रतिक्विंटल सरासरी दर हा १ हजार ८०० रूपये एवढा होता. या बाजार समितीमध्ये हालवा कांद्याची केवळ ९९ क्विंटल एवढी आवक झाली होती.

आजचे सविस्तर कांद्याचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/03/2024
अकोला---क्विंटल53590016001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल351040016001000
कराडहालवाक्विंटल9950018001800
बारामतीलालक्विंटल72140016711100
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल40860018001200
जळगावलालक्विंटल126950017801137
पंढरपूरलालक्विंटल20320018001300
नागपूरलालक्विंटल1240100015001375
सिन्नर - नायगावलालक्विंटल218650015501400
भुसावळलालक्विंटल18100015001300
यावललालक्विंटल60096013401090
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल580740019001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6150016001550
पुणे-मोशीलोकलक्विंटल72350015001000
जामखेडलोकलक्विंटल10161501700925
मंगळवेढालोकलक्विंटल3315012001000
नागपूरपांढराक्विंटल1000110015001400
नाशिकउन्हाळीक्विंटल136070016501400
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल520060015001450
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल723690016001500
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल55220017001000

Web Title: Onion Rates How much onion rate end of financial year 150 rs per quintle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.