Join us

Onion Rates : नाफेड खरेदी भ्रष्टाचाराच्या धामधुमीत बाजार समितीमध्ये कांद्याला किती मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 9:02 PM

आज राज्यभरातील कांद्याला किती मिळाला दर

कांद्यामुळे सध्या राज्यात वातावरण तापलं आहे. नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीमध्ये काळाबाजार झाल्याचं उघड झाल्यानंतर शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. दरम्यान, आज राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला संमिश्र दर मिळाला आहे.

आज दौंड-केडगाव, राहता, पुणे, लासलगाव, निफाड, अकोले, जुन्नर-ओतूर, कोपरगाव आणि पारनेर या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली होती. आजच्या दिवसांतील सर्वांत जास्त आवक ही पुणे बाजार समितीमध्ये १२ हजार ९६५ क्विंटल एवढी झाली होती.

आजच्या दिवसांतील किमान आणि कमाल दराचा विचार केला तर आज पुणे-मोशी बाजार समितीमध्ये १ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. या बाजार समितीमध्ये ६७३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर लासलगाव-निफाड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ३ हजार ५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

आजचे सविस्तर कांद्याचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/06/2024
दौंड-केडगाव---क्विंटल3375140035002800
सातारा---क्विंटल175250030002750
राहता---क्विंटल694650032002550
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल4250033002000
धाराशिवलालक्विंटल37160030002300
भुसावळलालक्विंटल17220030002500
पुणेलोकलक्विंटल1296580030001900
पुणे- खडकीलोकलक्विंटल23150025002100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल17150032002350
पुणे-मांजरीलोकलक्विंटल77170026002200
पुणे-मोशीलोकलक्विंटल673100022001600
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1260115132003050
अकोलेउन्हाळीक्विंटल133480033512875
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल6536150035102500
कोपरगावउन्हाळीक्विंटल4640100030672800
पारनेरउन्हाळीक्विंटल7782100035002600
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड