Lokmat Agro >बाजारहाट > Onion Rates : नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर कांद्याला किती मिळतोय दर?

Onion Rates : नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर कांद्याला किती मिळतोय दर?

Onion Rates On the auspicious occasion of Navratri, how much is the price of onion? | Onion Rates : नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर कांद्याला किती मिळतोय दर?

Onion Rates : नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर कांद्याला किती मिळतोय दर?

Onion Rates : पणन मंडळाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार आज राज्यातील केवळ बार्शी बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे २ हजार ९१० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. 

Onion Rates : पणन मंडळाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार आज राज्यातील केवळ बार्शी बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे २ हजार ९१० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. 

शेअर :

Join us
Join usNext

खरिपातील कांदा आता काढणीला आला असून बाजारात नव्या कांद्याची आवक वाढत आहे. लेट खरिपातील कांद्याच्या लावगडी आवरत आल्या आहेत. सध्या राज्यभरातील महत्त्वाच्या बाजारातील आवक वाढलेली दिसत आहे. पणन मंडळाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार आज राज्यातील केवळ बार्शी बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे २ हजार ९१० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. 

राज्यातील कोल्हापूर, मुंबई (कांदा-बटाटा मार्केट), सोलापूर, नागपूर, संगमनेर, राहुरी, कळवण, कोपरगाव या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत आहे. सर्व बाजार समित्यांमध्ये लाल, लोकल, उन्हाळी कांद्याची आवक होताना दिसत आहे. कांद्याला सध्या २ हजार ते ४ हजार ३०० पर्यंत सरासरी दर मिळताना दिसत आहे. 

दरम्यान, आज छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे १ हजार ९०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. तर नाशिक बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार ३५० रूपये सरासरी दर मिळाला आहे. येथे ९३३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. आज सोलापूर बाजार समितीमध्ये राज्यातील सर्वांत जास्त ३२ हजार ९२५ क्विंटल कांद्याची आवक झाली होती.

आजचे सविस्तर कांद्याचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/10/2024
कोल्हापूर---क्विंटल5964150045003000
अकोला---क्विंटल410150035002500
जळगाव---क्विंटल558100035002250
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल54030035001900
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल17834250047003600
सातारा---क्विंटल72300042003600
सोलापूरलालक्विंटल3292550052502600
बारामतीलालक्विंटल706100042003200
जळगावलालक्विंटल167185043273000
नागपूरलालक्विंटल2400200040003500
संगमनेरलालक्विंटल4306100045002750
कोपरगावलालक्विंटल112200030912591
इंदापूरलालक्विंटल24950041002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल469150038002650
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल4477200043003150
पुणेलोकलक्विंटल10281250045003500
पुणे- खडकीलोकलक्विंटल5200036002800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4250048003650
पुणे-मोशीलोकलक्विंटल241150035002500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल400400043994200
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल81100035002500
नागपूरपांढराक्विंटल2000220040003550
नाशिकपोळक्विंटल90110036002900
नाशिकउन्हाळीक्विंटल933380050504350
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल172550045003500
कळवणउन्हाळीक्विंटल16700150051003900
संगमनेरउन्हाळीक्विंटल1806150045003000
कोपरगावउन्हाळीक्विंटल1552150044814045

Web Title: Onion Rates On the auspicious occasion of Navratri, how much is the price of onion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.