Join us

बारामतीत तूर, हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 10:29 AM

बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्रासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने तूर व चना (हरभरा) साठीची ऑनलाइन नोंदणी दि. २८ मार्चपासून सुरू झाली आहे.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्रासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने तूर व चना (हरभरा) साठीची ऑनलाइन नोंदणी दि. २८ मार्चपासून सुरू झाली आहे.

खरेदी कालावधीसाठी २८ मार्च ते २५ जूनपर्यंत मुदत आहे. ऑनलाइन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची तूर प्रति क्विंटल दर रु. ७,०००/- व चना (हरभरा) प्रति क्विंटल दर रु. ५,४४०/- ने खरेदी करणेत येणार आहे. सध्या तूर व हरभरा नवीन हंगाम सुरू झाल्याने बाजारात आवक सुरू झाली आहे.

बारामतीमध्ये शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झाले असून, शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर मुदतीत नाव नोंदणी करून खरेदी केंद्राचा फायदा घ्यावा, असे आवाहन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार आणि उपसभापती नीलेश लडकत यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी तूर व हरभरा पिकाची नोंद असलेल्या चालू सातबारा उतारा (पिकपेरा), आधारकार्डची छायांकित प्रत व चालू असलेले बँक खाते अचूक तपशिलासह झेरॉक्स, मोबाइल नंबर इ. आवश्यक कागदपत्रे तसेच एकापेक्षा जास्त बँक खातेकरिता एकाच शेतकऱ्यांची नोंद असू नये.

तरी तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी निरा कॅनॉल संघ, तीन हत्ती चौक बारामती येथे प्रथम ऑनलाइन नाव नोंदणी करावी. खरेदी सुरू झाल्यानंतर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार तूर व हरभरा खरेदी केंद्रावर आणण्यासाठी नंबर नुसार एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.

अधिक वाचा: आता पोस्टाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बागेतील आंबा थेट देश-विदेशात

टॅग्स :बाजारमार्केट यार्डहरभरातूरशेतकरीबारामतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीऑनलाइन