Lokmat Agro >बाजारहाट > राज्यातल्या केवळ २ बाजार समित्यांनी सोयाबीनला दिला हमीभावाएवढा दर

राज्यातल्या केवळ २ बाजार समित्यांनी सोयाबीनला दिला हमीभावाएवढा दर

Only 2 market committees in the state have given the guaranteed price to soybeans | राज्यातल्या केवळ २ बाजार समित्यांनी सोयाबीनला दिला हमीभावाएवढा दर

राज्यातल्या केवळ २ बाजार समित्यांनी सोयाबीनला दिला हमीभावाएवढा दर

राज्यभरातील सयोाबीनला किती मिळाला दर?

राज्यभरातील सयोाबीनला किती मिळाला दर?

शेअर :

Join us
Join usNext

आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला. यामध्ये त्यांना तेलबिया उत्पादनामध्ये भारताला सक्षम करण्यासाठी तेलबिया आत्मनिर्भर अभियान राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. तर आजचे महाराष्ट्रातील सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याचं चित्र आहे. राज्यातील केवळ दोन बाजार समित्यांनी हमीभावाएवढा दर दिला आहे. 

यंदा कमी पावसामुळे राज्यातील सोयाबीनचे उत्पादन घटले असूनही सोयाबीनला दर नाही. त्याचबरोबर मागणी आणि पुरवठ्याचे गणित लक्षात घेता सोयाबीनचे दर वाढतील असा अंदाज असल्याने केंद्र सरकारकडून सोयापेंडीची आयात करून सोयाबीनचे दर नियंत्रणात ठेवण्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी दर वाढण्याच्या अपेक्षेने कापूस अन् सोयाबीनची साठवणूक करून ठेवली आहे अशा शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

दरम्यान, आज बाजारात हायब्रीड, लोकल, पिवळा, पांढरा या सोयाबीनची आवक झाली होती. तर पणन मंडळाच्या अद्ययावत माहितीनुसार आज गंगाखेड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार ७०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. त्यापाठोपाठ उमरखेड बाजार समितीमध्ये ४ हजार ६२० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. मांढळ बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ३ हजार ३५० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. एकीकडे तेलबिया आत्मनिर्भर अभियानाची घोषणा अन् दुसरीकडे शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या दराची ही अवस्था पाहायला मिळत आहे.

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/02/2024
लासलगाव---क्विंटल350350044814450
लासलगाव - विंचूर---क्विंटल330300044204350
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल41422642514238
सिल्लोड---क्विंटल2430043004300
कारंजा---क्विंटल3000405044154270
तुळजापूर---क्विंटल110445144514451
मोर्शी---क्विंटल400415045004325
राहता---क्विंटल6432443304326
धुळेहायब्रीडक्विंटल4310542303925
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल192408044804440
सोलापूरलोकलक्विंटल63430045504450
अमरावतीलोकलक्विंटल3329425043374293
नागपूरलोकलक्विंटल230410043024251
अमळनेरलोकलक्विंटल3400040004000
हिंगोलीलोकलक्विंटल600405044254237
कोपरगावलोकलक्विंटल204350043754251
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल20370144813876
मांढळलोकलक्विंटल46320036503350
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल193350044354400
लातूरपिवळाक्विंटल13749380045814450
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल180420044014300
जालनापिवळाक्विंटल1245380043504325
अकोलापिवळाक्विंटल2522409043504290
यवतमाळपिवळाक्विंटल355410043454222
मालेगावपिवळाक्विंटल7400043754361
चिखलीपिवळाक्विंटल825400044004200
हिंगणघाटपिवळाक्विंटल2286270044453700
वाशीमपिवळाक्विंटल3000422543654300
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल900420043004250
पैठणपिवळाक्विंटल4422542254225
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल114423043004265
जिंतूरपिवळाक्विंटल49432543814341
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल950419043754250
वणीपिवळाक्विंटल196359543604000
जामखेडपिवळाक्विंटल41420044004300
गेवराईपिवळाक्विंटल27430043254312
परतूरपिवळाक्विंटल12420044004300
गंगाखेडपिवळाक्विंटल20470048004700
सेनगावपिवळाक्विंटल61395043004100
पाथरीपिवळाक्विंटल6350043504300
नेर परसोपंतपिवळाक्विंटल389417544204341
उमरखेडपिवळाक्विंटल100460046504620
काटोलपिवळाक्विंटल58400043604250
पुलगावपिवळाक्विंटल78367542704100
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल650400045004450

Web Title: Only 2 market committees in the state have given the guaranteed price to soybeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.