नरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) आवारात सोमवार (१० फेब्रुवारी) पासून मृग बहाराच्या (Mrig Bahar) संत्रा खरेदीला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीच्या वतीने संत्रा उत्पादकांचा गौरव करण्यात आला.
पहिल्या दिवशी संत्र्याला ३० ते ३५ हजार रुपये प्रतिटन दर मिळाला. नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत संत्रा (Orange) खरेदीला प्रारंभ झाला.
या वेळी बाजार समितीचे सभापती सुरेश आरघोडे, उपसभापती चंद्रशेखर मदनकर, संचालक दिनेश्वर राऊत, रमेश शेटे, रूपेश मुंदाफळे, जानराव ढोकणे, संचालक तथा व्यापारी मुशीर शेख उपस्थित होते. सुरेश आरघोडे यांच्या हस्ते प्रथम लिलाव झालेल्या विनोद ठाकरे (रा. टेंभूरखेडा, ता. वरुड, जिल्हा अमरावती) या संत्रा उत्पादक शेतकऱ्याचा दुपट्टा, टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला बाजार समितीचे अडते व व्यापारी बब्बूभाईमियाँ रईसमियाँ, नईमभाई, ओमप्रकाश मैनानी, येवगेश मैनानी, विलायतीलाल सहगल, दीपक सहगल, दिनेश खत्री, जय खत्री, अशफाक पठाण, रामराव सोमकुवर, बाबूराव कठाणे, इद्रीस पठाण, हादी काझी, शेख सादिक, संदीप बालपांडे, मुश्ताक पठाण, सुरेश गिरडकर, अब्बतुलाह खान, सुधाकर ढोके, मुर्तुजा गुलाब नबी शेख, शाबीर शेख, बाजार समितीचे सचिव सतीश येवले, कोषपाल राधेश्याम मोहरिया, कनिष्ठ लिपिक सुनील कडू, पुरुषोत्तम दातीर अमोल ठाकरे, रवींद्र बांदरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
किमान १,४०० गाड्यांची आवक
नरखेड बाजार समितीच्या आवारात पहिल्या दिवशी १ हजार २०० ते १ हजार ५०० गाड्या संत्र्याची आवक झाली. या बाजार समितीत खुल्या लिलाव पद्धतीने संत्रा खरेदी विक्री केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य भाव मिळविण्यासाठी त्यांच्याकडील संत्रा नरखेड बाजार समितीत विकायला आणावा, असे आवाहन सभापती सुरेश आरघोडे यांनी केले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Crop Management: संत्री, मोसंबीवरील पाने खाणारी अळी, सायलाचे असे करा व्यवस्थापन