Join us

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याची उधळणीला चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 10:24 AM

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौद्यावेळी बेदाण्याची उधळण होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते.

तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौद्यावेळी बेदाण्याची उधळण होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. याबाबत 'व्यापार बेदाण्याचा शेतीमालाच्या लुटीचा' वृत्त मालिका 'लोकमत' मधून प्रसिद्ध करण्यात आली होती.

त्यानंतर मनसेकडून कारवाईसाठी निवेदन देण्यात आले होते. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकाराची चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश सहायक निबंधकांना दिले.

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणाऱ्या बेदाणा सौद्यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असते. बेदाणा सौदा आणि विक्री व्यवस्थेत शेतकऱ्यांच्या लुटीबाबत 'लोकमत' मधून वृत्त मालिका प्रसिद्ध करण्यात आली.

त्यानंतर मनसेकडून अमोल काळे यांनी जिल्हा उपनिबंधकांना बेदाणा उत्पादकांची लूट थांबविण्याबाबत निवेदन दिले होते. लूट थांबवली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही काळे यांनी निवेदनाद्वारे दिला होता.

त्यानंतर जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सहायक निबंधकांना बेदाणा उधळणीची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :द्राक्षेबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसांगलीशेतकरीतासगाव-कवठेमहांकाळ