Lokmat Agro >बाजारहाट > Paddy Market : कडधान्याचे दर वाढतायत भाताला भाव कधी?

Paddy Market : कडधान्याचे दर वाढतायत भाताला भाव कधी?

Paddy Market : The prices of pulses are increasing When increase the price of paddy | Paddy Market : कडधान्याचे दर वाढतायत भाताला भाव कधी?

Paddy Market : कडधान्याचे दर वाढतायत भाताला भाव कधी?

वसई तालुक्यात भात पिकाची लागवड होते. भात पिकाचा पेरा अधिक असला तरी काही शेतकरी जुन्या भाताची विक्री नवीन भात पीक निघण्यापूर्वी करतात. दर वाढेल, हा यामागील हेतू असतो; परंतु सध्या भाताचे दर घसरलेलेच आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

वसई तालुक्यात भात पिकाची लागवड होते. भात पिकाचा पेरा अधिक असला तरी काही शेतकरी जुन्या भाताची विक्री नवीन भात पीक निघण्यापूर्वी करतात. दर वाढेल, हा यामागील हेतू असतो; परंतु सध्या भाताचे दर घसरलेलेच आहेत.

कडधान्यांची आवक घटल्याने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्याचे दर वाढले आहेत. सध्या तुरीला प्रतिक्विंटल ९ हजार, हरभरा ६२२० भाव मिळत असल्याने भरडधान्य उत्पादन करणारे शेतकरी तेजीत आहेत. तर भाताला प्रती क्विंटल भात खरेदी केंद्रात कमी भाव मिळत असल्याने भात उत्पादक शेतकरी नाराज आहेत.

बाजारात भाताची आवक घटली
पावसाळ्याला सुरुवात होताच भाताची आवक कमालीने घटते. सध्या महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाताची आवक कमालीची घटली आहे. नवे भात उपलब्ध झाल्यानंतर विक्रीत वाढ होईल. बाजार समितीत शेतकऱ्यांकडून हमीभावात भाताची खरेदी केली जाते. तर हंगामात आधारभूत खरेदी केंद्रांचा शुभारंभ केला जात असल्याने कुणी फारशी साठवणूक करीत नाही.

भाताचे भाव आणखी वधारणार?
• मागील खरीप व उन्हाळी हंगामातील भात अनेक शेतकऱ्यांकडे शिल्लक नाही. तर नवे भात बाजारात येण्यास आणखी तीन महिने अवधी शिल्लक आहे.
• परिणामी पुढील महिन्यात जुन्या धानाचे दर वधारू शकतात. वसई आठवडे बाजारात उडीद, मूग, तूर व अन्य कडधान्याची विक्री केली जाते.
• तसेच वसई तालुक्यात कडधान्य उत्पादन कमी असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत कडधान्याची विक्री व खरेदी होत नाही.

नवीन भात निघण्यापूर्वी जुन्या भाताला चांगला भाव मिळतो. मात्र, नवीन पीक हाती येताच दर कमी केले जात असल्याने आम्ही भात न विकता तांदूळ करून विकत असल्याने तांदळाला चांगला दर मिळतो. - प्रकाश भोईर, शेतकरी

शासनाचा आधारभूत भात खरेदी केंद्रात हमीभाव कमी असल्यामुळे वाढ करावी, शासनाकडून मिळणारा हमीभाव हा खूपच कमी आहे. - लक्ष्मीप्रसाद पाटील, शेतकरी

Web Title: Paddy Market : The prices of pulses are increasing When increase the price of paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.