Lokmat Agro >बाजारहाट > धान खरेदीचा कालावधी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत

धान खरेदीचा कालावधी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत

Paddy procurement period till 31 January 2024 | धान खरेदीचा कालावधी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत

धान खरेदीचा कालावधी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत

धान व भरडधान्य खरेदीचा कालावधी यामध्ये खरीप पणन हंगामातील धान पिकाचा खरेदी कालावधी ९ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ तर भरडधान्याचा खरेदी कालावधी १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ असा आहे.

धान व भरडधान्य खरेदीचा कालावधी यामध्ये खरीप पणन हंगामातील धान पिकाचा खरेदी कालावधी ९ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ तर भरडधान्याचा खरेदी कालावधी १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ असा आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पणन हंगाम २०२३-२४ करिता केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी ९ नोव्हेंबर, २०२३ रोजी शासन आधारभूत निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत प्रसिद्धीपत्राद्वारे कळविण्यात आले आहे. २१८३ रुपये आधारभूत किमतीने या भात खरेदीबाबत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. धान व भरडधान्य खरेदीचा कालावधी यामध्ये खरीप पणन हंगामातील धान पिकाचा खरेदी कालावधी ९ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ तर भरडधान्याचा खरेदी कालावधी १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ असा आहे.

मार्गदर्शक सूचना:
नवीन खरेदी केंद्रे व खरेदी संस्था निवडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
यात जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असणार असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा पुरवठा अधिकारी हे सदस्य तर जिल्हा पणन अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत.
खरेदीसाठी प्रत्येक गाव एका विशिष्ट खरेदी केंद्रास जोडण्यात यावे. 
खरेदी केंद्रांना जोडलेल्या गावांचे क्षेत्र व गावनिहाय शेतकऱ्यांची यादी तलाठ्याकडून प्राप्त करून घेऊन त्याची नोंद ठेवण्यात यावी.
शेतकऱ्यांकडील भात खरेदी करताना ऑनलाइन खरेदी पद्धत सुरू केली आहे. संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी आवश्यक आहे.
त्याकरिता ऑनलाइन नोंदणी, आधार क्रमांक, बचत बँक खाते क्रमांक नोंदणी कण्यात येत आहे.
केंद्रशासनाने निर्धारित केलेल्या ३ नवीन मिनीमम थ्रेशोल्ड पॅरामीटर नुसार शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी ही आधार प्रमाणीकरण पद्धत वापरूनच करण्यात यावी.

वर्गवारी करून माहिती द्यावी
-
यासाठी आवश्यक असलेली आधार प्रमाणीकरण यंत्र सर्व केंद्रांना उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ही मुख्य अभिकर्ता यांची असणार आहे.
- तसेच केंद्र शासनाच्या यापूर्वीच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांची सीमांत, लघु, मध्यम, मोठे शेतकरी अशी जमीनधारणेवर आधारित तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर व अवर्गीकृत अशी वर्गवारी करून माहिती देण्याची विनंती राज्य शासनाने केली आहे.

शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून केंद्र शासनाने हंगाम २०२३-२४ करीता पुढीलप्रमाणे आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत. यात भात, ज्वारी (संकरीत), ज्वारी (मालदांडी), बाजरी, मका, रागी इ. पिकांचा समावेश आहे.

Web Title: Paddy procurement period till 31 January 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.