Join us

सकाळच्या सत्रात या बाजारसमितींमध्ये तूर १० हजार पार,जाणून घ्या सविस्तर दर

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 03, 2024 3:06 PM

राज्यात सध्या तूरीचा चांगला भाव मिळत असून आज सकाळच्या सत्रात राज्यात एकूण ८९३७ क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती.

राज्यात सध्या तूरीचा चांगला भाव मिळत असून आज सकाळच्या सत्रात राज्यात एकूण ८९३७ क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती. अमरावती बाजारसमितीत आज ३८४३ क्विंटल लाल जातीच्या तूरीला आज सर्वाधिक भाव मिळत असून क्विंटलमागे १० हजार ८४९ रुपयांचा भाव मिळत आहे. 

आज अमरावतीसह धाराशिव, लातूर, नागपूर, वाशिम या बाजारसमितीत तूरीला १० हजारहून अधिक भाव मिळत आहे.वर्धा, नांदेड या बाजारसमितीत तूरीला क्विंटलमागे सर्वसाधारण ९६५० रुपये भाव मिळत आहे. बुलढाणा बाजारपेठेत आज १५७ क्विंटल तूरीची आवक झाली. क्विंटलमागे तूरीला ९७५० रुपयांचा भाव मिळत आहे.

जालन्यात १० क्विंटल पांढऱ्या व लाल तूरीची आवक झाली. यावेळी ८००० ते ८५०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. 

जाणून घ्या सविस्तर दर

शेतमाल: तूर

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/04/2024
अमरावतीलाल3843105001119910849
बुलढाणालाल1558800107009750
बुलढाणापांढरा2850090008500
धाराशिवलाल691001010010000
धुळेलाल13600095008800
हिंगोलीलाल619700102009950
जळगावलाल2915091509150
जालनालाल4800086508500
जालनापांढरा6750090008700
लातूर---750104001100010700
लातूरलाल105102551067510375
नागपूरलाल290195001100010625
नांदेडलाल149675102009750
परभणीपांढरा7810095009201
वर्धालाल18885097209650
वाशिम---105090001100010200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)8937
टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्ड