Join us

Pigeon Pea Market बाजारात लाल तुरींची सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय तुरीला दर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 4:17 PM

राज्यात आज १७३४ क्विंटल तुरीची आवक झाली होती. आज लाल तुरींची सर्वाधिक आवक दिसून आली तर केवळ एका ठिकाणी काळी तूर विक्रीस आली होती. 

राज्यात आज १७३४ क्विंटल तुरीची आवक झाली होती. आज लाल तुरींची सर्वाधिक आवक दिसून आली तर केवळ एका ठिकाणी काळी तूर विक्रीस आली होती. 

सर्वाधिक आवक आज अमरावती येथे ६५४ क्विंटल, कारंजा ५०० क्विं., अकोला ३९० क्विं., आदी ठिकाणी होती. तर उमरगा येथे एक क्विं. तसेच पूर्णा २ व परतूर ३ क्वि. कमीतकमी आवक होती. 

लाल तुरीला आज सर्वाधिक आवक असलेल्या अमरावती येथे १०५१० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. तर कमी आवक असलेल्या उमरगा येथे ९७००, पूर्णा येथे ९१००, परतूर येथे ८१५० दर मिळाला. 

केवळ एकाच बाजारसमितीमध्ये आवक असलेल्या काळ्या तुरीस आज पाथरी येथे १०२०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील तूर आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/07/2024
कारंजा---क्विंटल50093001088010200
पाथरीकाळीक्विंटल1800080008000
अकोलालालक्विंटल3908000109709900
अमरावतीलालक्विंटल654103001072110510
चिखलीलालक्विंटल1597001030010000
वाशीम - अनसींगलालक्विंटल3098501020010000
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल66105001080010650
परतूरलालक्विंटल3800089508150
उमरगालालक्विंटल1970097009700
पुर्णालालक्विंटल2910091009100
नेर परसोपंतलालक्विंटल6100001010010050
दुधणीलालक्विंटल6695001060010050
टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती