Join us

Pigeon Pea Market हिंगोली मार्केट यार्डात तुरीची आवक मंदावली; दरवाढीची चमक कायम!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 11:00 AM

गतवर्षी पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीच्या उत्पादन निम्म्याखाली आले. परिणामी, बाजारात आवक कमी राहिली. त्यामुळे भाव समाधानकारक मिळाला, सध्याही तुरीला दरवाढीची चमक कायम आहे. परंतु, शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी तूरच शिल्लक नसल्याने आवक मंदावली आहे.

गतवर्षी पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीच्या उत्पादन निम्म्याखाली आले. परिणामी, बाजारात आवक कमी राहिली. त्यामुळे भाव समाधानकारक मिळाला, सध्याही तुरीला दरवाढीची चमक कायम आहे. परंतु, शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी तूरच शिल्लक नसल्याने आवक मंदावली आहे.

 हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन, हळद, कापूस पाठोपाठ तुरीचा पेरा होतो. परंतु, गत दोन वर्षांपासून पावसाचा लहरीपणा आणि किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने तुरीच्या उत्पादनात घट होत आहे. गेल्यावर्षी तर निम्म्याखाली उत्पादन आले.

त्यामुळे बाजार समितीच्या मोंढ्यात आवक तुलनेने कमीच राहिली. परंतु, भाव समाधानकारक मिळाला. मे, जूनमध्ये ९ ते १० हजारांचा भाव मिळाला. त्यावेळी सरासरी २०० ते २५० क्विंटलची आवक होत होती. आता मात्र शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक राहिलेली नाही.

त्यामुळे मोंढ्यात आवक मंदावली असून, ५० क्विंटलच्या आतच तूर विक्रीसाठी येत आहे. आवक मंदावल्यामुळे मात्र भाव वधारल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्या १० हजार ते ११ हजार २०० रुपये क्विंटलने विक्री होत आहे. भाव चांगला मिळत असला तरी सध्या तूर विक्रीसाठी शिल्लक नसल्याने या भाववाढीचा फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हळदीच्या भावातही घसरण

■ मे, जूनमध्ये सरासरी १६ हजार रुपयांचा भाव मिळालेली हळद सध्या १४ हजार रुपयांखाली घसरली आहे.

■ परिणामी, मार्केट यार्डात आवक मंदावली आहे. समाधानकारक भाव मिळत असताना ज्या शेतकऱ्यांनी आणखी भाववाढीची आशा केली त्यांना फटका बसला आहे. येणाऱ्या दिवसांतही हळदीचे भाव वाढतील याची शाश्वती व्यापारी देत नसल्याने शेतकरी द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत.

सोयाबीन पडत्या भावात

आज उद्या भाव वाढतील या आशेवर शेतकऱ्यांनी सात ते आठ महिन्यांपासून सोयाबीन विक्रीविना ठेवले. मात्र, अजूनही दरकोंडी कायम असून, यंदा सोयाबीन विक्रीतून लागवडही वसूल झाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. किमान ६ हजार रुपयांचा भाव मिळणे अपेक्षित होते.

मात्र, सोयाबीनने पाच हजाराचा पल्लाही गाठला नाही. सध्या मोंढ्यात ४ हजार ९० ते ४ हजार ४०० रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. तर आवक सरासरी ४०० क्विंटल होत आहे.

हेही वाचा - Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी

टॅग्स :तूरशेतीशेतकरीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेती क्षेत्र