Lokmat Agro >बाजारहाट > तुरीला सोलापुरात मिळाला सर्वाधिक दर; काय मिळाला बाजारभाव

तुरीला सोलापुरात मिळाला सर्वाधिक दर; काय मिळाला बाजारभाव

pigeon pea tur got the highest rate in Solapur; What is the market price? | तुरीला सोलापुरात मिळाला सर्वाधिक दर; काय मिळाला बाजारभाव

तुरीला सोलापुरात मिळाला सर्वाधिक दर; काय मिळाला बाजारभाव

हमीभाव केंद्रावर तूर विकण्यासाठी शेतकरी तयार नसल्याने बाजार भावाने तूर खरेदी केंद्र उघडण्यात आली खरी. शेतकऱ्याने याकडेही पाठ फिरवली आहे. दरम्यान नाफेडचा शुक्रवारी राज्यात या केंद्रावर तूर खरेदी दर सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यात निघाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

हमीभाव केंद्रावर तूर विकण्यासाठी शेतकरी तयार नसल्याने बाजार भावाने तूर खरेदी केंद्र उघडण्यात आली खरी. शेतकऱ्याने याकडेही पाठ फिरवली आहे. दरम्यान नाफेडचा शुक्रवारी राज्यात या केंद्रावर तूर खरेदी दर सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यात निघाला आहे.

बाजारभावाने तूर खरेदीची जबाबदारी नाफेडवर आहे. नाफेडमार्फत तूर खरेदीसाठी ३४३ केंद्रे तयार असून या केंद्रांवर तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन पणन मंडळाने केले आहे. अवघ्या २०१७ शेतकऱ्यांनी नोंद केली असली तरी तूर मात्र बाजार समित्यांमध्ये करण्यात येत आहे. नव्याने एकही शेतकरी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करीत नाहीत.
राज्यात दररोज बाजार समितीत होणाऱ्या लिलावाची सरासरी काढून त्या-त्या जिल्हााचे दर ठरविले जातात. 

ते दर राज्यभरातील खरेदी केंद्रासाठी पाठविले जातात. यामध्ये दररोज जिल्ह्याचे दर बदलतात. त्यामुळे सर्वाधिक दर देणारे जिल्हे दररोजच बदलत असतात. शक्रवारी क्विंटलला सर्वाधिक ९ हजार ४५५ रुपये दर सोलापूर जिल्ह्यासाठी ठरवून दिला होता. राज्यात महिनाभरात बाजारभाव केंद्रावर तूर खरेदीला आली नसल्याचे सांगण्यात आले.

अधिक वाचा: बॅडगी मिरचीसारखी दिसणारी गुजरातची गोंडल कोल्हापुरात खातेय भाव

सोलापूर- धाराशिव- लातूर
दररोज राज्यात सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, अकोला, हिंगोली, औरंगाबाद या जिल्ह्यात ९ हजार रुपयांपेक्षा अधिक दर असतो. शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात ९४५५ रुपये, धाराशिव जिल्ह्यात ९४१८ रुपये, लातूर जिल्ह्यात ९२३८ रुपये, बीड जिल्ह्यात ९ हजार ३० रुपये, अकोला जिल्ह्यात ९ हजार १३ रुपये, हिंगोली जिल्ह्यात ८९२१ रुपये, संभाजीनगर जिल्ह्यात ८९०३ रुपये, वर्धा जिल्ह्यात
८८९१ रुपये तसेच इतर जिल्ह्यात यापेक्षा कमी दर ठरवून दिला आहे.

सोलापुरात १० हजार २०० रुपये
सोलापूर बाजार समितीत शुक्रवारी तुरीला उच्चांकी दर मिळाला. बसप्पा कलशेट्टी यांच्या आडतीला १० हजार २०० रुपये दराने तूर विक्री झाली. देशेट्टी या शेतकऱ्याची तूर १० हजार २०० रुपयाने विक्री झाली. कमीतकमी ८८०० ते १०, २०० रुपये व सर्वसाधारण दर ९,७०० रुपये मिळाला.

Web Title: pigeon pea tur got the highest rate in Solapur; What is the market price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.