Join us

Pigeon Pie: बाजारपेठेत तूरीला झळाळी, क्विंटलमागे मिळतोय असा भाव

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 13, 2024 3:23 PM

सध्या विदर्भात तूरीची आवक वाढली असून भावही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा तूर विक्रीसाठी कल वाढला आहे.

सध्या राज्यात तूरीची मोठी आवक होत असून क्विंटलमागे मिळणारा भाव १२ हजारापर्यंत जात आहे. आज शनिवारी सकाळच्या सत्रात ४७३९ क्विंटल तूरबाजारपेठेत विक्रीसाठी आली होती. त्यामुळे बाजारपेठेत सध्या तूर चांगलीच चमकली असल्याचे चित्र आहे.

अमरावती बाजारसमितीत आज लाल तूरीची सर्वाधिक १७४४ क्विंटल आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण ११७५२ ते १२१५५ रुपयांचा भाव मिळाला. विदर्भातून तूरीची सध्या सर्वाधिक आवक होत असून लाल व माहोरी जातीच्या तूरीला चांगला भाव मिळत आहे.विदर्भातून आवक अधिक होत असून भावही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा तूर विक्रीकडे कल वाढला आहे.

उर्वरित ठिकाणी कशी आहे आवक व भाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/04/2024
अमरावतीलाल1744113501215511752
अमरावतीमाहोरी110080001199511475
बुलढाणापांढरा6700096009000
छत्रपती संभाजीनगर---108500104009900
छत्रपती संभाजीनगरलाल7296001167510633
छत्रपती संभाजीनगरपांढरा1890001084010274
धाराशिवलाल28500110009750
हिंगोलीलाल73110001150011250
जळगावलाल10926594009400
जालनालाल1493251070010225
जालनापांढरा5750085008000
लातूर---1110001100011000
नागपूरलाल87499001210211552
परभणीलाल1097501110110930
वाशिम---80095001205011495
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4739
टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्ड