Join us

PM Modi's Visit: नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर असताना लासलगावला कांदा बाजारभाव असे होते

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 2:37 PM

onion market rate : एका बाजूला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवक दिवस आणि युवा महोत्सवासाठी नाशिक शहरात दौऱ्यावर असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगाव बाजारसमित्यांमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळाला? हे जाणून घेऊ

आज दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारसमितीत लाल कांद्याची १० हजार २०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ९०० रुपये तर सरासरी बाजारभाव १७५० रुपये इतका होता. लोकमत ॲग्रोच्या बाजारभाव तक्त्यानुसार कालच्या तुलनेत आजचे सरासरी बाजारभाव काहीसे घसरल्याचे आढळून आले.

पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत आज सकाळच्या सत्रात पोळ कांद्याला कमीत कमी ४०० तर सरासरी १७५० रुपये बाजारभाव मिळाले.

  पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

दरम्यान कांदा निर्यातबंदीनंतर बाजारातील भाव सातत्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्याच सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त नाशिकला दौरा असल्याने कांदा निर्यातबंदी मागे घेण्याबाबत ते बोलतील असे अनेक शेतकऱ्यांना वाटत होते. तर काहींना पंतप्रधानांना भेटण्याची अपेक्षा होती. परंतु तसे घडू शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आणि त्यांच्या प्रतिनिधींची निराशा झाली. 

आज राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील कांदा बाजारभाव असे आहेत

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
कोल्हापूर---481550025001500

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---10504140022001800
खेड-चाकण---200100020001500
येवलालाल1500040018501650

येवला -

आंदरसूल

लाल1300030018621750
लासलगावलाल1020090020001750

लासलगाव

- निफाड

लाल1000112519011800

लासलगाव

- विंचूर

लाल1100080019521775
जळगावलाल346437517871300
मनमाडलाल450040018511650
देवळालाल580040020651875
राहतालाल121420020001500

सांगली -

फळे भाजीपाला

लोकल220040021001250
पुणे-मोशीलोकल46540018001100

चाळीसगाव-

नागदरोड

लोकल1600120018151700
मंगळवेढालोकल6035016901400
कल्याणनं. १3180020001900
पिंपळगाव बसवंतपोळ1170040021221750
टॅग्स :कांदानरेंद्र मोदीराष्ट्रीय युवा दिननाशिकस्वामी विवेकानंद