Join us

शेतकऱ्याच्या हापूसला चांगला दर मिळावा यासाठी आंबा फळ, पेटी व बॉक्सवर 'क्यूआर कोड'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:39 PM

यावर्षी निर्माण केलेल्या 'क्यूआर कोड'मध्ये त्याची एक्स्पायरी डेट, आंबा पॅकिंगची तारीख, आंबा परिपक्व होण्याची तारीख, आंबा बागायतदारांच्या अन्य माहितीमध्ये बागेचे फोटो, गुगल लोकेशन, शेतकऱ्याची माहिती, त्यांचे मोबाइल नंबर, ई-मेल यांसारख्या अनेक आवश्यक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

कोकण हापूस आंबा उत्पादक व उत्पादक सहकारी संस्थेने भौगोलिक निर्देशांक नोंदणीकृत बागायतदारांसाठी 'क्यूआर कोड' तयार केले आहेत. ग्राहकांना अस्सल हापूस आंबा मिळावा व शेतकऱ्याला हापूस विक्रीमुळे चांगला दर मिळावा, यासाठी आंबा फळावर, पेटी, बॉक्सवर लावण्यासाठी 'क्यूआर कोड' तयार केले आहेत.

आतापर्यंत सव्वालाख 'क्यूआर कोड' लावलेल्या आंब्याची विक्री झाली आहे. संस्थेने हापूस आंबा फळावर लावण्यासाठी आठ लाख, तर पेटी व बॉक्सवर लावण्यासाठी एक लाख 'क्यूआर कोड'चे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

कोकण हापूस आंबा उत्पादक व उत्पादक सहकारी संस्थेने 'क्यूआर कोड' तयार करून ते आमच्या संस्थेला पुरवण्यासंबंधी आणि अॅक्टिव्ह करण्यासंबंधी 'मीरो लॅब' या कंपनीबरोबर करार केला आहे.

फळावर लावण्याचा 'क्यूआर कोड' प्रति ६५ पैसे प्रतिनग दराने पुरवत आहे. बागायतदारांना कोड अॅक्टिव्ह कसा करावा, यासाठी प्रशिक्षणही दिले जात आहे. 

संस्थेची स्वतःचे संकेतस्थळ नेहमी अद्ययावत करण्यात येते. त्यावर वेळोवेळी माहितीही पुरवली जाते. ही संस्था कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी नोंदणीकृत असून, त्यामध्ये पाचही जिल्ह्यांतील आंबा बागायतदार शेतकरी सभासद आहेत.

'क्यूआर कोड'ला एक्स्पायरी डेट नसल्यामुळे तो रिफ्यूज होण्याची शक्यता होती. तसेच त्याचा पुनर्वापर करून त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकत होता.  

मात्र यावर्षी निर्माण केलेल्या 'क्यूआर कोड'मध्ये त्याची एक्स्पायरी डेट, आंबा पॅकिंगची तारीख, आंबा परिपक्व होण्याची तारीख, आंबा बागायतदारांच्या अन्य माहितीमध्ये बागेचे फोटो, गुगल लोकेशन, शेतकऱ्याची माहिती, त्यांचे मोबाइल नंबर, ई-मेल यांसारख्या अनेक आवश्यक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

शासनस्तरावर वेगवेगळ्या खात्यांच्या माध्यमातून हापूस आंब्याच्या विक्रीवेळी होणारी भेसळ रोखली गेली तर हापूस आंब्याला चांगला दर मिळून बागायदारांना चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा जोशी यांनी व्यक्त केली. 

अनुदानाची अपेक्षाशासनाच्या एखाद्या योजनेमधून जर संस्थेला अनुदान मिळाले तर संस्थेकडून १० पट वेगाने जीआय नोंदणीचा प्रसार करू शकणार आहे. बागायतदारांना कमी दरात मार्केटिंगसाठी 'क्यूआर कोड' पुरवू शकणार असल्याचा विश्वास संस्थेचे सचिव मुकुंदराव जोशी यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा: आखाती देशांसह अमेरिकन, युरोपीयनही आंब्याच्या प्रेमात; दररोज १० टन आंबा परदेशात

टॅग्स :आंबाबाजारकोकणशेतकरीमार्केट यार्डशेतीफलोत्पादनफळे