रब्बीतील हरभरा काढणीस सुरुवात झाली असून नवीन हरभराबाजारपेठेत दाखल होत आहे. मागील दोन दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये साधारण १ लाख क्विंटल हरभऱ्याची विक्रमी आवक होत आहे. बाजारसमितीत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.हरभऱ्याला क्विंटलमागे सर्वसाधारण ५५०० ते ७२०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असून शेतकऱ्यांचा विक्रीकडे कल वाढला आहे.
दरम्यान, काल हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने अकोला बाजार समितीच्या प्रांगणात हरभरा उतरवण्यासही जागा उरली नाही. परिणामी आज आज दि ६ मार्च रोजी हरभऱ्याची वाहने बाजार समित्यांमध्ये स्विकारली जाणार नसल्याची माहिती आहे. बाजार समिती प्रशासनाद्वारे अडत्यांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
आज दिनांक ६ मार्च रोजी १८ हजार ८५४ क्विंटल हरभऱ्याची आवक राज्यभरातल्या बाजार समित्यांमध्ये सकाळच्या सत्रात झाली. लोकल, काट्या, लाल, गरडा, चाफा वाणाचा हरभरा बाजारपेठेत शेतकरी घेऊन येत आहेत. क्विंटलमागे ५८०० ते ७००० रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे.
जाणून घ्या कोणत्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव..
जिल्हा | आवक | कमीत कमी दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|
अमरावती | 12193 | 5500 | 5800 |
छत्रपती संभाजीनगर | 5 | 5445 | 5445 |
धाराशिव | 60 | 5400 | 5500 |
धुळे | 118 | 6805 | 7195 |
हिंगोली | 85 | 5450 | 5525 |
मंबई | 1261 | 5800 | 7200 |
नागपूर | 4426 | 5000 | 5518 |
पुणे | 38 | 6300 | 6700 |
सांगली | 19 | 5400 | 5550 |
सोलापूर | 86 | 5600 | 5975 |
सोलापूर | 33 | 5500 | 5530 |
यवतमाळ | 290 | 5335 | 5355 |
यवतमाळ | 240 | 5400 | 5500 |