Lokmat Agro >बाजारहाट > सांगलीतील बेदाण्याचे सौदे होणार नवीन जागेत; बाजार समितीने घेतली साडेतेरा एकर जमीन

सांगलीतील बेदाण्याचे सौदे होणार नवीन जागेत; बाजार समितीने घेतली साडेतेरा एकर जमीन

Raisin deals in Sangli will be held in the new premises; The market committee bought thirteen and a half acres of land | सांगलीतील बेदाण्याचे सौदे होणार नवीन जागेत; बाजार समितीने घेतली साडेतेरा एकर जमीन

सांगलीतील बेदाण्याचे सौदे होणार नवीन जागेत; बाजार समितीने घेतली साडेतेरा एकर जमीन

बाजार समितीने सावळी येथे साडेतेरा एकर जमीन १३ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. ती जागा विकसित करण्यासाठी पाच कोटी खर्च बाजार समिती प्रशासनाने केले

बाजार समितीने सावळी येथे साडेतेरा एकर जमीन १३ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. ती जागा विकसित करण्यासाठी पाच कोटी खर्च बाजार समिती प्रशासनाने केले

शेअर :

Join us
Join usNext

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याचे सौदे सावळी (ता. मिरज) येथे हलवण्याचे नियोजन बाजार समिती आणि असोसिएशनने केले आहे.

सावळी येथे असोसिएशन हॉल बांधणार असून महिन्याभरात काम करून सौदे सुरू करण्याचे नियोजन आहे. सावळीला जाण्यासाठी ५० टक्के व्यापाऱ्यांचा विरोध आहे.

बाजार समितीने सावळी येथे साडेतेरा एकर जमीन १३ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. ती जागा विकसित करण्यासाठी पाच कोटी खर्च बाजार समिती प्रशासनाने केले. 

आहेत. बेदाणा असोसिएशन आणि बाजार समिती अशी एकत्र बैठकही घेण्यात आली होती. यामध्ये बाजार समिती प्रशासनाने सावळी येथे मूलभूत सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार ५० टक्के बेदाणा व्यापाऱ्यांनी सावळीला सौदे हलविण्याची तयारी दाखविली आहे; पण उर्वरित ५० टक्के व्यापाऱ्यांचा सावळीला सौदे हलविण्यास विरोधच आहे.

काही मोठ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी सौदे सावळीला घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एवढेच नव्हे, तर सौद्यांसाठी शेड करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे.

Web Title: Raisin deals in Sangli will be held in the new premises; The market committee bought thirteen and a half acres of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.