Join us

Raisin राज्यात सव्वादोन लाख टनांपर्यंत बेदाण्याचे उत्पादन; दरात तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 11:26 AM

राज्यात गतवर्षी दोन लाख ७० हजार टन बेदाण्याचे Raisin उत्पादन झाले होते. यंदा त्यामध्ये ५० हजार टनांची घट होऊन ते दोन लाख २० हजार टन झाले आहे. उत्पादन मर्यादित असल्यामुळे बेदाण्याचे उत्पादन प्रतिकिलो १३० ते २५० रुपयांपर्यंत आहेत.

सांगली : राज्यात गतवर्षी दोन लाख ७० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. यंदा त्यामध्ये ५० हजार टनांची घट होऊन ते दोन लाख २० हजार टन झाले आहे. उत्पादन मर्यादित असल्यामुळे बेदाण्याचे उत्पादन प्रतिकिलो १३० ते २५० रुपयांपर्यंत आहेत.

महाराष्ट्रामध्ये तीन ते चार लाख एकर द्राक्षाचे क्षेत्र आहे. यातून दरवर्षी ३० लाख टनांपर्यंत द्राक्षाचे उत्पादन होते. देशात द्राक्षाचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होत आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक द्राक्ष उत्पादनात नंबर एक असून, त्यानंतर सांगली जिल्ह्याचा नंबर लागत आहे.

सोलापूर जिल्ह्यात ३.०९ टक्के व उस्मानाबाद जिल्ह्यात २.६९ टक्के द्राक्ष उत्पादन होते. उरलेली ३.१५ टक्के द्राक्षांचे उत्पादन अहमदनगर, पुणे, लातूर, जळगाव, सातारा, छत्रपती संभाजीनगर, धुळे, बुलढाणा व जालना जिल्ह्यांत होत आहे. २०२२-२३ च्या हंगामामध्ये महाराष्ट्रात द्राक्षाचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे दर कमी होते.

दर नसल्यामुळे शेतकरी बेदाण्याकडे वळला होता. यामुळे बेदाण्याचे विक्रमी दोन लाख ७० हजार टनांपर्यंत उत्पादन झाले होते. शीतगृहे बेदाण्याने फुल्ल झाली होती. परिणामी बेदाण्याचे दरही पडले. यामुळे उत्पादक शेतकरी नाराज होते.

२०२३-२४ च्या हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागाच काढून टाकल्या. अवकाळी पावसाचाही फटका बसल्यामुळे उत्पादन घटले आहे. द्राक्षांना दरही चांगला राहिल्यामुळे शेतकऱ्यांचा बेदाणा तयार करण्याकडे फारसा कल दिसून आला नाही. त्यामुळे या वर्षी दोन लाख २० हजार टनांपर्यंत बेदाण्याचे उत्पादन झाले आहे. उत्पादन कमी असल्यामुळे प्रतिकिलो १३० ते २५० रुपये दर मिळत आहे.

बेदाण्याचे दर (प्रतिकिलो)बेदाणा प्रकार -  दर• हिरवा बेदाणा - १५० ते २५०• पिवळा बेदाणा - १२० ते १७०• काळा बेदाणा - ४० ते ७०

अधिक वाचा: Young Farmer Success Story सोळा वर्षाच्या प्रणवची डाळिंब शेती; काढतोय पाऊणकोटीचे उत्पन्न

टॅग्स :बाजारमार्केट यार्डद्राक्षेशेतकरीसांगलीमहाराष्ट्रनाशिकशेती