Kiri Market: उन्हाळा सुरु होत असून बाजारात कैऱ्या येण्यास सुरुवात झाली आहे. कैरीपासून तक्कू, कायरस करण्यासाठी ग्रामीण भागात महिलांची लगबग सुरु झाली आहे. बाजारात कैऱ्यांची आवक सुरु झाली आहे. किलोमागे साधारण ६० ते ७० रुपयांनी कैऱ्यांची विक्री होत आहे.
आज दिवसभरात ४१० क्विंटल कैऱ्यांची आवक झाली. मुंबई बाजारसमितीत २२० क्विंटल कैऱ्या दाखल झाल्या. तर पुण्यात ९६ क्विंटल कैऱ्यांची आवक झाली. क्विंटलमागे ५००० ते ६००० रुपयांचा भाव मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत ४६ क्विंटल कैऱ्यांची आवक झाली. क्विंटलमागे सर्वसाधारण ६००० रुपयांचा भाव मिळाला.मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून कैऱ्यांची आवक होण्यास सुरुवात होत असून ५००-६०० क्विंटलची साधारण आवक होत आहे.
किती होतेय आवक?
तारिख
४ मार्च- ५०५ क्विंटल
५ मार्च- ६९४ क्विंटल
६ मार्च- ६४८ क्विंटल
७ मार्च- ५७८ क्विंटल
८ मार्च- १३४ क्विंटल
९ मार्च- १०१ क्विंटल
११ मार्च- २३७ क्विंटल
१२ मार्च- ४१० क्विंटल
आज काय सुरु आहे भाव?र
जिल्हा | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|
12/03/2024 | ||||
अहमदनगर | 3 | 5000 | 5000 | 5000 |
छत्रपती संभाजीनगर | 46 | 5000 | 7000 | 6000 |
मंबई | 220 | 4000 | 6000 | 5000 |
नागपूर | 45 | 4000 | 5000 | 4750 |
पुणे | 96 | 4500 | 5500 | 5000 |