Join us

बाजारात कैऱ्या येण्यास सुरुवात, कुठे होतेय सर्वाधिक आवक? काय मिळतोय भाव?

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 12, 2024 4:10 PM

मार्च सुरु होताच कैऱ्यांची आवक होण्यास सुरुवात, किलोमागे किती मिळतोय भाव?

Kiri Market: उन्हाळा सुरु होत असून बाजारात कैऱ्या येण्यास सुरुवात झाली आहे. कैरीपासून तक्कू, कायरस करण्यासाठी ग्रामीण भागात महिलांची  लगबग  सुरु झाली आहे. बाजारात कैऱ्यांची आवक सुरु झाली आहे. किलोमागे साधारण ६० ते ७० रुपयांनी कैऱ्यांची विक्री होत आहे. 

आज दिवसभरात ४१० क्विंटल कैऱ्यांची आवक झाली. मुंबई बाजारसमितीत २२० क्विंटल कैऱ्या दाखल झाल्या. तर पुण्यात ९६ क्विंटल कैऱ्यांची आवक झाली. क्विंटलमागे ५००० ते ६००० रुपयांचा भाव मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत ४६ क्विंटल कैऱ्यांची आवक झाली. क्विंटलमागे सर्वसाधारण ६००० रुपयांचा भाव मिळाला.मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून कैऱ्यांची आवक होण्यास सुरुवात होत असून ५००-६०० क्विंटलची साधारण आवक होत आहे.

किती होतेय आवक?

तारिख४ मार्च- ५०५ क्विंटल५ मार्च- ६९४ क्विंटल६ मार्च- ६४८ क्विंटल७ मार्च- ५७८ क्विंटल८ मार्च- १३४ क्विंटल९ मार्च- १०१ क्विंटल११ मार्च- २३७ क्विंटल१२ मार्च- ४१० क्विंटल

आज काय सुरु आहे भाव?र

जिल्हाआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/03/2024
अहमदनगर3500050005000
छत्रपती संभाजीनगर46500070006000
मंबई220400060005000
नागपूर45400050004750
पुणे96450055005000

 

टॅग्स :आंबाबाजारमार्केट यार्ड