Join us

कैरीचा भाव स्थिरावतोय, आज सकाळच्या सत्रात आवक मंदावली, भाव काय मिळतोय?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 11, 2024 3:11 PM

पुण्यात कैरीची सर्वाधिक आवक, शेतकऱ्यांना मिळतोय असा बाजारभाव

राज्यात उन्हाळा सुरु झाला असून कैऱ्यांची आवक वाढली आहे. आज सर्वाधिक आवक पुणे बाजारसमितीत झाली असून क्विंटलमागे सर्वसाधारण ४००० रुपयांचा भाव मिळत आहे.

पुण्यातील मोशी बाजारसमितीत २९ क्विंटल तर पुणे बाजारसमितीत ११४ क्विंटल कैऱ्यांची आज सकाळच्या सत्रात आवक झाली. आज ईदमुळे बाजार थंडावल्याचे चित्र असून आवक घटली आहे. दरम्यान काल दि १० रोजी पुण्यात ३८८ क्विंटल कैरी   विक्रीसाठी आली होती. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण ३५०० रुपयांचा भाव मिळाला.

सध्या मुंबईत कैऱ्यांची सर्वाधिक आवक होत असून भाव ३००० ते ३५०० रुपयांवर स्थिरावला आहे.

जाणून घ्या मागील दोन दिवस कशी होती आवक?

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/04/2024
राहता---3300030003000
पुणेलोकल114200050003500
पुणे -पिंपरीलोकल1400040004000
पुणे-मोशीलोकल29400040004000
10/04/2024
छत्रपती संभाजीनगर---45150020001750
मंचर---11200040003000
श्रीरामपूर---10150025002000
हिंगणा---4200030002500
नाशिकहायब्रीड60170040003000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकल120300035003250
पुणेलोकल388200050003500
जुन्नर -ओतूरलोकल13100021101700
नागपूरलोकल140200030002750
मुंबईलोकल888250035003000
09/04/2024
छत्रपती संभाजीनगर---70220037002950
मंचर---29140039102655
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकल107300040003500
पुणेलोकल154200040003000
पुणे- खडकीलोकल1250025002500
पुणे-मोशीलोकल35300040003500
जुन्नर -ओतूरलोकल6200031102500
नागपूरलोकल120250035003250
मुंबईलोकल585300040003500
टॅग्स :आंबाबाजार