Lokmat Agro >बाजारहाट > यंदा शासकीय हमीभाव केंद्रांवर भाताची विक्रमी खरेदी; किती झाली खरेदी?

यंदा शासकीय हमीभाव केंद्रांवर भाताची विक्रमी खरेदी; किती झाली खरेदी?

Record purchase of rice at government MSP centers this year; How much did you buy? | यंदा शासकीय हमीभाव केंद्रांवर भाताची विक्रमी खरेदी; किती झाली खरेदी?

यंदा शासकीय हमीभाव केंद्रांवर भाताची विक्रमी खरेदी; किती झाली खरेदी?

शासनाकडून होत असलेल्या हमीभाव भात खरेदीला शेतकऱ्यांकडून यावर्षी खरीप हंगामात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शासनाकडून होत असलेल्या हमीभाव भात खरेदीला शेतकऱ्यांकडून यावर्षी खरीप हंगामात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

शासनाकडून होत असलेल्या हमीभाव भात खरेदीला शेतकऱ्यांकडून यावर्षी खरीप हंगामात चांगला प्रतिसाद मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील २४ हमीभाव भात केंद्रांवर ११ मार्चपर्यंत २५ हजार ११८ शेतकऱ्यांनी आपले भात विकले आहे. ५ लाख ८१ हजार १४७ क्विंटल भाताची खरेदी यावर्षीच्या हंगामात झाली आहे.

यामध्ये पेण तालुका आघाडीवर असून १ लाख ४६ हजार क्विंटल भाताची आवक आठ हमीभाव केंद्रात झाली आहे. गतवर्षी १ लाख ६७ हजार क्विंटल भाताची आवक केंद्रावर झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेने भातखरेदी वाढलेली आहे.

मागील काही वर्षांतील भातखरेदी (कंसात हमीभाव)

वर्षखरेदीभाव
२०१८-१९१,७०,०००१,७५०
२०१९-२०२,१९,०००१,८१५
२०२०-२१४,१०,०००१,८६८
२०२१-२२५,२२,०००१,९४०
२०२२-२३५,७०,०००२,०४०
२०२३-२४५,८१,०००२,१८३

खरेदीत आणखी वाढ होणार
■ ११ मार्चपर्यंत ५ लाख ८१ हजार क्विंटल जिल्ह्यातील हमीभाव केंद्रावरची ही आकडेवारी आहे, पेण तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाटा जास्त आहे.
■ यावर्षी दोन लाख क्विंटल हमीभाव केंद्रावर भाताची आवक होण्याची शक्यता भात खरेदी केंद्रावरील सूत्रांनी माहिती देताना सांगितले आहे.
■ यामधे वाशी खारेपाट विभागातील वढाव, बोर्झे, मोठे भाल आणि शिर्की या केंद्रात मोठ्या प्रमाणात भाताची विक्री शेतकरी बांधवांनी केली आहे.

भात लागवड क्षेत्र
■ रायगड जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते.
■ तर पेणमध्ये १२ हजार ८०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. पेणचे भात लागवड एकूण क्षेत्र १३ हजार १०० हेक्टर आहे.

१४३ रुपयांची वाढ
गतवर्षी भातासाठी २ हजार ४० रुपये भाव देण्यात आला होता. यंदा त्यात १४३ रुपयांनी वाढ झाली आहे. प्रति क्विंटल २,१८३ रुपये दर मिळाल्याने शेतकरी समाधानी आहे.

Web Title: Record purchase of rice at government MSP centers this year; How much did you buy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.