शासनाकडून होत असलेल्या हमीभाव भात खरेदीला शेतकऱ्यांकडून यावर्षी खरीप हंगामात चांगला प्रतिसाद मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील २४ हमीभाव भात केंद्रांवर ११ मार्चपर्यंत २५ हजार ११८ शेतकऱ्यांनी आपले भात विकले आहे. ५ लाख ८१ हजार १४७ क्विंटल भाताची खरेदी यावर्षीच्या हंगामात झाली आहे.
यामध्ये पेण तालुका आघाडीवर असून १ लाख ४६ हजार क्विंटल भाताची आवक आठ हमीभाव केंद्रात झाली आहे. गतवर्षी १ लाख ६७ हजार क्विंटल भाताची आवक केंद्रावर झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेने भातखरेदी वाढलेली आहे.
मागील काही वर्षांतील भातखरेदी (कंसात हमीभाव)
वर्ष | खरेदी | भाव |
२०१८-१९ | १,७०,००० | १,७५० |
२०१९-२० | २,१९,००० | १,८१५ |
२०२०-२१ | ४,१०,००० | १,८६८ |
२०२१-२२ | ५,२२,००० | १,९४० |
२०२२-२३ | ५,७०,००० | २,०४० |
२०२३-२४ | ५,८१,००० | २,१८३ |
खरेदीत आणखी वाढ होणार■ ११ मार्चपर्यंत ५ लाख ८१ हजार क्विंटल जिल्ह्यातील हमीभाव केंद्रावरची ही आकडेवारी आहे, पेण तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाटा जास्त आहे.■ यावर्षी दोन लाख क्विंटल हमीभाव केंद्रावर भाताची आवक होण्याची शक्यता भात खरेदी केंद्रावरील सूत्रांनी माहिती देताना सांगितले आहे.■ यामधे वाशी खारेपाट विभागातील वढाव, बोर्झे, मोठे भाल आणि शिर्की या केंद्रात मोठ्या प्रमाणात भाताची विक्री शेतकरी बांधवांनी केली आहे.
भात लागवड क्षेत्र■ रायगड जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते.■ तर पेणमध्ये १२ हजार ८०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. पेणचे भात लागवड एकूण क्षेत्र १३ हजार १०० हेक्टर आहे.
१४३ रुपयांची वाढगतवर्षी भातासाठी २ हजार ४० रुपये भाव देण्यात आला होता. यंदा त्यात १४३ रुपयांनी वाढ झाली आहे. प्रति क्विंटल २,१८३ रुपये दर मिळाल्याने शेतकरी समाधानी आहे.