Join us

नंदुरबारच्या प्रसिद्ध मिरची मार्केटमध्ये लाल मिरचीने सर्वाधिक भावाचा रेकॉर्ड तोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 11:47 AM

लाल मिरचीचा ठसका कायम असून, नंदुरबार बाजार समितीत कोरड्या लाल मिरचीची गुरुवारी तब्बल ३३ हजार ८०० रुपये क्चिटलने विक्री झाली.

नंदुरबार : लाल मिरचीचा ठसका कायम असून, नंदुरबारबाजार समितीत कोरड्या लाल मिरचीची गुरुवारी तब्बल ३३ हजार ८०० रुपये क्चिटलने विक्री झाली. आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले.

नंदुरबारचे लाल मिरचीचे मार्केट प्रसिद्ध आहे. दरवर्षी अडीच ते तीन लाख क्विंटल ओल्या मिरचीची आवक येथील बाजार समितीत होते. यंदादेखील साडेतीन लाख क्चिटलपर्यंत मिरचीची खरेदी झाली आहे. आता ओल्या मिरचीची आवक कमी झाली असून, कोरड्या मिरचीची आवक सुरू झाली आहे.

गुरुवारी वेळदा येथील शेतकऱ्याच्या कोरड्या लाल मिरचीला तब्बल ३३ हजार ८०० रुपये क्विंटल भाव मिळाला. प्रतवारीनुसार सरासरी ३२ हजार ते ३३ हजार ८०० रुपये क्विंटल भाव मिळत असल्याचे बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले. येत्या काळात कोरड्या लाल मिरचीचा आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :मिरचीबाजारमार्केट यार्डनंदुरबारपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती