Lokmat Agro >बाजारहाट > बाजारपेठेत लाल मिरचीचर ठसका वाढला,यंदा दोन महिन्यांतच १५०० क्विंटल आवक

बाजारपेठेत लाल मिरचीचर ठसका वाढला,यंदा दोन महिन्यांतच १५०० क्विंटल आवक

Red chillies have increased in market, this year 1500 quintals inflow in two months | बाजारपेठेत लाल मिरचीचर ठसका वाढला,यंदा दोन महिन्यांतच १५०० क्विंटल आवक

बाजारपेठेत लाल मिरचीचर ठसका वाढला,यंदा दोन महिन्यांतच १५०० क्विंटल आवक

लाल मिरचीला ८ हजारांपासून ते १९ हजारांपर्यंत प्रति क्विंटल भाव

लाल मिरचीला ८ हजारांपासून ते १९ हजारांपर्यंत प्रति क्विंटल भाव

शेअर :

Join us
Join usNext

धर्माबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची आवक गेल्या दोन वर्षांपासून वाढली असून, यंदा दोन महिन्यांत पंधराशे हजार क्विंटल लाल मिरचीची आवक झाली आहे. यंदा बीट वर लाल मिरचीला ८००० पासून ते १९००० हजार रुपये पर्यंत प्रति क्विटंल भाव मिळत असल्याने यंदा भावात उच्चांक गाठला आहे. दररोज शंभर ते दीडशे क्विटंल लाल मिरचीची आवक बाजार समितीत होत आहे.

धर्माबाद तालुका हा महाराष्ट्र- तेलंगणा राज्याच्या सीमेवर असल्याने दोन्हीही राज्यांचा संबंध आर्थिक व्यवहारांवरच नसून तेलंगणा राज्याशी रोटी बेटी संबंध जोडलेला आहे. धर्माबादेत बाजारपेठ मोठी असून कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत व्यवहार चालविला जातो. या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक वाढत आहे. धर्माबादची मिरची" म्हणून बाजारपेठ प्रसिद्ध आहे.

दहा वर्षांपूर्वी तालुक्यातून व तेलंगणातील परिसरातून मिरची, बाजार समितीत आयात होत होती. दहा वर्षांपासून मिरचीची लागवड परिसरात केली जात नसल्याने बाजार समितीत आवक शून्य झाली होती. गेल्या दोन शेतकऱ्यांनी बाजार समितीत लाल मिरची आणावी. यंदा लाल मिरचीला अधिक भाव मिळत असून शेतकऱ्यांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव सी. डी. पाटील यांनी केले आहे.

बाजार समितीतच लाल मिरची आणा, यंदा मिळतोय अधिक भाव

■ मिरची दररोज शंभर ते दीडशे प्रति क्विंटल बाजारात येत असून आठ हजार पासून ते १९००० रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. यावर शेतकरी समाधान आहे.

■वर्षांपासून लाल भडक तिखट मिरची बाजारात येत आहे. तेलंगणा, किनवट, बिलोली, नायगाव आदी भागातून लाल मिरचीची आवक होत आहे.

Web Title: Red chillies have increased in market, this year 1500 quintals inflow in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.