एप्रिल-मे महिन्यात शहरीसह ग्रामीण भागातही वर्षभरासाठीचा मसाला तयार करून ठेवला जातो. यासाठी आवश्यकतेनुसार मिरच्या खरेदी केल्या जातात. काही महिन्यांपासून मिरचीच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत होते. मात्र आता मिरच्यांच्या दरात काहीसी घसरण झाल्याचे चित्र हिंगोलीच्या बाजारपेठेत पहावयास मिळत आहेत. - त्यामुळे अनेकजण वर्षभरासाठीचे लाल तिखट तयार करून ठेवण्यासाठी मिरच्यांची खरेदी करीत आहेत.
एप्रिल, मे महिन्यात शेतीची कामे - आटोपतात. उन्हाचा पाराही वाढलेला असल्याने या काळात वर्षभरासाठी लागणारा मसाला, लाल तिखट, पापड, खारोड्या, कुरवड्या तयार करण्याची लगबग घरोघरी पहावयास मिळते. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात भाव वाढतात. यावर्षी दिवाळीपासूनच लाल मिरचीचा ठसका वाढला होता. सुक्या मसाल्याच्या लाल मिरच्यांचे दर बाजारातच ४०० ते ६०० रुपयांपर्यंत पोहचले होते.
यंदाही अवकाळी पाऊस, गारपीट तसेच रोगाच्या प्रादुर्भावामुळे मिरचीच्या उत्पादनात घट झाली असली तरी नव्या हंगामातील मिरची बाजारात दाखल होत आहे. दरम्यान, यंदा लाल मिरचीची आवक जानेवारीपासूनच सुरू झाली असून सध्या दरही आवाक्यात आहेत. लाल मिरचीच्या दरात घसरण झाल्याचे चित्र असून गृहीणींना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यांसह, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यातून लाल मिरचीची आवक होते. हिंगोलीच्या बाजारात सध्या बेडगी, गुंटूर, तेजा, चपाटा, तिखट, लवंगी मिरची उपलब्ध आहे.
हिंगोलीत परराज्यातून मिरचीची आवक होते. सध्या मिरचीच्या दरात किंचित घट झाली असून उन्हाळा असल्याने मिरची खरेदीसाठी नागरिक येत आहेत. - अब्दुल मुस्तकिन अब्दुल मतीन बागवान, लाल मिरची विक्रेता, हिंगोली
हिंगोलीच्या भाजीमंडईत असे आहेत दर
• गतवर्षी बेडगी मिरचीचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिकिलो होते. आता १५० ते ३५० रुपये प्रतिकिलो, तेजा २६० ते ३०० रुपये किलो होते. आता २०० ते २५०, गावरान मिरची २०० ते २२० रूपये होते.
• सध्या १९० ते २०० रुपये दर आहेत. गुंटूर ३०० ते ३५० रुपये होते. सध्या २८० ते ३०० रुपये प्रति किलो, लवंगी २५० ते ३०० रुपये होते.
• सध्या २०० ते २५० रुपये प्रति किलो दर असल्याचे चित्र आहे.
• दरम्यान, स्वच्छ केलेल्या, देठ तोडलेल्या मिरच्यांसाठी एका किलोमागे २० ते ३० रुपये अधिक मोजावे लागतात. मिरचीचा भाव थोडाफार कमी झाल्याने गृहीणींना मोठा आनंद होत आहे.
हेही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?