Lokmat Agro >बाजारहाट > मालेगावमध्ये लाल कांदा दाखल; लासलगाव-विंचूरसह आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

मालेगावमध्ये लाल कांदा दाखल; लासलगाव-विंचूरसह आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

Red onion introduced in Umrane apmc; know Today's onion market prices in Lasalgaon-Vinchur | मालेगावमध्ये लाल कांदा दाखल; लासलगाव-विंचूरसह आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

मालेगावमध्ये लाल कांदा दाखल; लासलगाव-विंचूरसह आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

आज लासलगाव, विंचूरसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील कांदा बाजारभाव असे आहेत. दरम्यान काल उमराणे येथे या हंगामातला लाल कांदा विक्रीस आला आहे.

आज लासलगाव, विंचूरसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील कांदा बाजारभाव असे आहेत. दरम्यान काल उमराणे येथे या हंगामातला लाल कांदा विक्रीस आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मालेगाव तालुक्यातील उमराणे येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत दसरा सणाच्या तीन आठवडे आधीच लाल (पावसाळी) कांदा विक्री आला असून मालेगाव तालुक्यातील निंबायती येथील शेतकरी गणेश साहेबराव गुमनर यांनी हा कांदा विक्री आणला होता. त्यास येथील गजानन आडतचे संचालक कांदा व्यापारी संजय देवरे यांनी सर्वोच्च बोली लावत २४१५ रुपये दराने हा कांदा खरेदी केला.

दरवर्षी दसरा सणानंतर नवीन नवीन लाल (पावसाळी कांदा विक्रीचा लाल कांदा बाजारात विक्रीस येण्यास सुरुवात होते. त्याअनुषंगाने येथील बाजार समितीत दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी विक्रीचा शुभारंभ करण्यात येतो; परंतु चालूवर्षी कमी पावसामुळे सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने लाल कांद्याचे उत्पादन घेणे तर दूरच; परंतु कांदा लागवडीसाठी लागणारी रोपेही जगविणे बहुतांशी शेतकऱ्यांना मुश्कील होते.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत निंबायती येथील शेतकरी गणेश गुमनर यांनी दसऱ्याच्या तीन आठवडे आधीच हा लाल कांदा उत्पादित करून उमराणे बाजार समितीत विक्रीस आणल्याने गुमनर यांचा सत्कार करण्यात आला. 

नवीन कांद्याचे केले पूजन
लाल कांद्याचे पूजन करण्यात आले. त्यावेळी कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश बाफना, कांदा व्यापारी सुनील देवरे, संजय देवरे, प्रवीण देवरे, महेंद्र मोदी, साहेबराव देवरे, शैलेश देवरे, रामराव ठाकरे, कैलास देवरे, रामराव देवरे, समितीचे कर्मचारी केशव देवरे, दिनेश बोरसे आदींसह कांदा व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्या उन्हाळी कांद्यावर परिणाम नाही
दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या परिक्षेत्रात चालू वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे लाल (पावसाळी) कांदा लागवडीवर यांचा विपरीत परिणाम झाला. काही लागवडी उशिरा झाल्याने नवीन लाल कांदा बाजारात विक्रीस येण्यास दीड महिना लागू शकतो, त्यामुळे सद्यःस्थितीत बाजारात विक्री येत असलेल्या उन्हाळी कांदा दरावर यांचा फारसा परिणाम होणार नसल्याचे कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी सांगितले.

आज लासलगाव विंचूरला असे आहेत कांदा बाजारभाव
आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात लासलगावची उपबाजारसमिती असलेल्या विंचूर बाजारसमितीत उन्हाळ कांद्याचे ८५० नग दाखल झाले. लिलावादरम्यान कमीत कमी बाजारभाव १२०० रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त २५४५रुपये प्रति क्विंटल, सरासरी २२५० रुपये प्रति क्विंटल असे होते.

राज्यात आज आणि काल कांदा बाजारभाव असे आहेत.

बाजार

समिती

जात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
५ ऑक्टोबर २३
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11577100024001700
खेड-चाकण---क्विंटल200100023001700
पुणेलोकलक्विंटल1531180024001600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल16160023001950
पुणे-मोशीलोकलक्विंटल85770022001450
कामठीलोकलक्विंटल26200030002500
कल्याणनं. १क्विंटल3200024002200
येवलाउन्हाळीक्विंटल700060023901900
लासलगावउन्हाळीक्विंटल8400100026002200
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल5000120025452250
मनमाडउन्हाळीक्विंटल500050025252000
४ ऑक्टोबर २३
कोल्हापूर---क्विंटल5191100027001900
अकोला---क्विंटल812180028002200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल247670022001450
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11788100024001700
खेड-चाकण---क्विंटल1100100023001700
मंचर- वणी---क्विंटल2662170025502185
सातारा---क्विंटल248150027002100
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल8050024001500
कराडहळवाक्विंटल123150022002200
सोलापूरलालक्विंटल2273210032001600
धुळेलालक्विंटल1170025602000
जळगावलालक्विंटल100380021501500
नागपूरलालक्विंटल1580200030002750
साक्रीलालक्विंटल2305120023502000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल390100045002750
पुणेलोकलक्विंटल1375180025001650
पुणे- खडकीलोकलक्विंटल17150040001950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल22150024001950
पुणे-मांजरीलोकलक्विंटल108170021001800
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल225030021001900
वाईलोकलक्विंटल20100025001750
मंगळवेढालोकलक्विंटल21560025302100
कल्याणनं. १क्विंटल3200024002200
सोलापूरपांढराक्विंटल65420048002400
नागपूरपांढराक्विंटल1500300040003750
येवलाउन्हाळीक्विंटल773550022761850
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल353130023911900
नाशिकउन्हाळीक्विंटल251570028002200
लासलगावउन्हाळीक्विंटल1364290025182151
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल4950100023032050
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल17000100024012100
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1000075023022100
सिन्नरउन्हाळीक्विंटल108150023312000
सिन्नर - दोडी बुद्रुकउन्हाळीक्विंटल347025025002000
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल111520024502000
कळवणउन्हाळीक्विंटल660080027002150
संगमनेरउन्हाळीक्विंटल299320024111305
चांदवडउन्हाळीक्विंटल2200111524632180
मनमाडउन्हाळीक्विंटल406740024012000
सटाणाउन्हाळीक्विंटल841060025252075
कोपरगावउन्हाळीक्विंटल462050025222050
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल3785450034502500
श्रीरामपूरउन्हाळीक्विंटल1047930028001650
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल818695028012200
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल569870023001950
पारनेरउन्हाळीक्विंटल1644030027001950
भुसावळउन्हाळीक्विंटल5180022002000
वैजापूरउन्हाळीक्विंटल454975022501950
कडाउन्हाळीक्विंटल711540026001900
देवळाउन्हाळीक्विंटल590055022252050

Web Title: Red onion introduced in Umrane apmc; know Today's onion market prices in Lasalgaon-Vinchur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.