मिरचीचा हंगाम सुरू झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत मिरचीचे भाव कमी झाले आहेत. गेल्या काही वर्षांत तयार मिरची पावडर खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे.
गतवर्षी मिरची व पावडरचे देखील दर वाढले होते. मात्र, यावर्षी दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
हंगाम सुरू यावर्षी मिरचीचे दर नियंत्रणात आहेत. हंगाम सुरू झाला असून, आवक अशीच वाढत राहिली, तर दर अजून काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. मिरचीचे दर नियंत्रणात येत आहेत. मार्च व एप्रिलअखेरपर्यंत मिरचीची मागणी वाढणार असून, यंदा भाव नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे.
मिरचीचे तुलनात्मक बाजारभाव
मिरचीचा प्रकार | २०२३ | २०२४ |
पांडी | २८० ते ३१० | १८० ते २०० |
तेजा | २८० ते ३०० | २२० ते २५० |
ब्याडगी | ६०० ते ६५० | ३५० ते ४०० |
काश्मिरी | ६०० ते ८०० | ४५० ते ५०० |
गुंटूर | ३५० ते ४०० | २७५ ते ३२५ |
तेजा | ३०० ते ३२५ | २२५ ते २५० |
लवंगी | ३०० ते ३२० | २५० ते २७५ |
काश्मिरी | ७०० ते ७५० | ६२५ ते ६५० |