Lokmat Agro >बाजारहाट > Reshim Kosh Bazar : फसवणूक टाळण्यासाठी रेशीम कोष बाजार समितीमध्येच आणा

Reshim Kosh Bazar : फसवणूक टाळण्यासाठी रेशीम कोष बाजार समितीमध्येच आणा

Reshim Kosh Bazar : Silk cocoon reshim kosh should be sale in market committee to avoid fraud | Reshim Kosh Bazar : फसवणूक टाळण्यासाठी रेशीम कोष बाजार समितीमध्येच आणा

Reshim Kosh Bazar : फसवणूक टाळण्यासाठी रेशीम कोष बाजार समितीमध्येच आणा

खुली बाजारपेठ विक्री व्यवस्था असताना ही काही खरेदीदार परस्पर अनधिकृतपणे शेतकऱ्यांकडून परस्पर दर ठरवून कोष खरेदी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

खुली बाजारपेठ विक्री व्यवस्था असताना ही काही खरेदीदार परस्पर अनधिकृतपणे शेतकऱ्यांकडून परस्पर दर ठरवून कोष खरेदी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

बारामती : बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य यार्ड येथे रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचे मान्यतेने रेशीम कोष खरेदी विक्री खुली बाजारपेठ केंद्र सुरू आहे.

परंतु खुली बाजारपेठ विक्री व्यवस्था असताना ही काही खरेदीदार परस्पर अनधिकृतपणे शेतकऱ्यांकडून परस्पर दर ठरवून कोष खरेदी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ही बाब समितीचे कायद्याचे दृष्टीने बेकायदेशीर आहे. रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी आपली फसवणूक टाळणेसाठी आपला माल बारामतीचे रेशीम कोष मार्केटमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन बारामती बाजार समितीचे सभापती सुनील पवार यांनी केले आहे.

सभापती पवार, तसेच उपसभापती नीलेश लडकत व सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले की, रेशीम कोष मार्केटमध्ये ई-नामद्वारे ऑनलाईन पद्धतीने लिलाव होत असल्याने योग्य दर, अचूक वजन व वेळेत व खात्रीशीर पेमेंट मिळत असल्याने रेशीम कोष मार्केटमध्ये पारदर्शक व्यवहार होत आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांची विश्वासहर्तता वाढत चालली आहे. शेतकऱ्यांना वेळेत ऑनलाईन पेमेंट मिळत असल्याने परिसरातील व आसपासच्या जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी बारामती मार्केटमध्ये कोष विक्रीस आणत आहेत.

काही खरेदीदार बेकायदा परस्पर खरेदी व्यवहारामध्ये योग्य दर देत नसल्याचे व वजनात कपाती, कडती अशा गोष्टी घडत असल्याच्या तक्रारी समितीकडे येत आहेत.

कोषास योग्य दर व अचूक वजन न देणे तसेच वेळेत पेमेंट न करणे आदी मार्गाने व परस्पर खरेदीमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे समितीचे निदर्शनास आले आहे.

कोष खरेदीसाठी परवाना घ्या
-
रेशीम कोष हा शेतमाल शासनाने नियमनात आणला असल्याने याचा समाविष्ठ बाजार समितीचे नियमनात येत आहे.
- महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ कलम ३२ अ अन्वये लायसन्सधारक व अनधिकृत खरेदीदार यांनी परस्पर माल खरेदी करू नये, विनापरवाना व परस्पर माल खरेदी करणे बेकायदेशीर आहे.
- असा प्रकार आढळून आल्यास सदरचा कोष वाहनासह जप्त करणेत येईल व पुढील कायदेशीर कारवाई करणेत येईल. कृपया याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
- ज्यांना रेशीम कोष खरेदी करावयाचे आहेत. त्यांनी परवाना घेणेसाठी बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Reshim Kosh Bazar : Silk cocoon reshim kosh should be sale in market committee to avoid fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.