Join us

Reshim Market : 'रेशीम'ला आले सोन्याचे दिवस; क्विंटलमागे 'इतक्या' हजारांचा भाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 15:42 IST

Reshim Market बीडमध्ये उत्पादित होणाऱ्या रेशीम reshim कोषांना आता सोन्याच्या तुलनेत भाव मिळू लागला आहे. वाचा सविस्तर

राहुल नवघरे

बीड : बीडमध्ये उत्पादित होणाऱ्या रेशीम reshim कोषांना आता सोन्याच्या तुलनेत भाव मिळू लागला आहे. रेशीमच्या दर्जेदार कोषाला ६८ हजार रुपये प्रति क्विंटल भाव सध्या आहे. तर सरासरी कोषाला ५२ हजारांपेक्षाही जास्त भाव मिळत आहे.

रेशीम शेतीला पाणी कमी आणि भाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा या व्यवसायाकडे कल वाढत आहे. ऊसतोड कामगारांचा, कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून बीड ओळखला जातो, मात्र, दोन दशकांपासून बीडकरांनी कमी जागेत, कमी पाण्यात, जास्त कष्ट करून रेशीम उद्योगाला चालना दिली. एक एकरपासून ते साडेतीन, चार एकरामध्ये रेशीम शेती फुलवून नवा पाया रचला आहे.

ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही ओळख मिटवून रेशीम उद्योजकांचा जिल्हा म्हणून नवी ओळख बीड जिल्ह्याला मिळत आहे. कमी क्षेत्रावर रेशीम उद्योग उभारून ऊसतोड कामगार आपल्या स्वतः च्या शेतात रेशीम शेतीचे उत्पादन घेऊन ऊसतोडीतून मिळणाऱ्या पैशापेक्षाही जास्त पैसे यातून मिळविताना दिसत आहेत.

आगामी जून महिन्याच्या तयारीसाठी जिल्हा रेशीम उद्योग विभागाकडून पुढच्या आठवड्यापासून महारेशीम अभियान सुरु करण्यात येणार आहे. या महारेशीम अभियानात शेतकऱ्यांनी नावनोंदणी करून घ्यावी, त्यानंतरच सभासदत्व मिळणार आहे. जो सभासद होतो त्यालाच पुढे रेशीम उद्योगासाठी ४ लाख १८ हजारांपर्यंत अनुदानही प्राप्त होते. - एस.बी.वराट, जिल्हा रेशीम विकास अधिकारी

८२५ मे.टन कोषाची निर्मिती

शेतकऱ्यांनी तुती लागवड करून चांगल्या दर्जाच्या कोषाची निर्मिती केली आहे. नोव्हेंबरपर्यंत ५ हजार ४०६ शेतकऱ्यांनी तब्बल ८२५ मे.टन कोषाची निर्मिती करण्यात आली आहे. ५२ हजारांपासून ते ६८ हजारांपर्यंत शेतकऱ्यांच्या रेशीम कोषाला भाव मिळाला आहे.

काय आहे जिल्ह्यातील स्थिती

तालुका     शेतकरी लागवड (एकरांत)
गेवराई                                       १४१४ १४९३
शिरुर                                           ७२७५
बीड                                            ९३७  १०२८
माजलगाव                                      ३६८  ३७५
अंबाजोगाई                                         ६५५७२३
परळी                                                 ६८८६९५
केज                       २९८३३१
धारुर                           ४३७ ४४२
वडवणी                                               १६५ १७५
शिरुर                             ७२  ७५
पाटोदा                                              १७९  १८१
आष्टी                                        १९३१९३

हे ही वाचा सविस्तर : Sericulture Farming : वाढत्या थंडीत रेशीम शेतीची अशी घ्या काळजी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्ररेशीमशेतीकृषी योजनाशेतकरीबाजारमार्केट यार्ड