Join us

'भारत तांदूळ' या ब्रँड अंतर्गत ग्राहकांना तांदळाची किरकोळ विक्री सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 2:55 PM

सामान्य ग्राहकांना भारत तांदूळ विक्रीसाठी किरकोळ किंमत रु. २९/किलो आहे. तांदूळ ५ किलो आणि १० किलोच्या पिशवीतून विकला जाईल. भारत तांदूळ फिरत्या व्हॅन आणि तीन केंद्रीय सहकारी संस्थांच्या दुकानात खरेदीसाठी उपलब्ध असेल आणि लवकरच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह इतर किरकोळ साखळीद्वारे देखील उपलब्ध होईल.

एकूणच अन्नधान्य महागाईचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि तथ्यहीन अनुमान रोखण्यासाठी, केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील व्यापारी/घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठ्या साखळीतील किरकोळ विक्रेते, प्रक्रियाकर्त्यांना पुढील आदेशापर्यंत तांदूळ/धानाचा साठा उघड करणे अनिवार्य केले आहे.

संबंधित कायदेशीर घटक जसे की व्यापारी/घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठ्या साखळीतील किरकोळ विक्रेते, प्रक्रियाकर्त्यांना (१) तुकडा तांदूळ, (२) बिगर-बासमती पांढरा तांदूळ, (३) उकडा तांदूळ, (४) बासमती तांदूळ, (५) धान यांसारख्या श्रेणींमध्ये धान आणि तांदळाच्या साठ्याबाबतची माहिती जाहीर करावी लागेल. या घटकांनी दर शुक्रवारी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या पोर्टलवर https://evegoils.nic.in/rice/login.html अद्ययावत माहिती देणे अपेक्षित आहे. ऑर्डर जारी केल्यापासून ७ दिवसांच्या आत तांदळाच्या साठ्याची स्थिती या घटकांना घोषित करावी लागेल.

याशिवाय, खाद्य अर्थव्यवस्थेतील महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी, सर्वसामान्य ग्राहकांना ‘भारत तांदूळ’ ची किरकोळ विक्री सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात, नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भांडार या ३ संस्थांमार्फत 'भारत तांदूळ' ब्रँड अंतर्गत किरकोळ विक्रीसाठी ५ एलएमटी तांदूळ वाटप करण्यात आले आहेत.

अधिक वाचा: दर वाढेल म्हणून कापूस अन् सोयाबीनची साठवणूक केली, बाजारभाव गेले मात्र हमीभावापेक्षा खाली

सामान्य ग्राहकांना भारत तांदूळ विक्रीसाठी किरकोळ किंमत रु. २९/- किलो आहे. तांदूळ ५ किलो आणि १० किलोच्या पिशवीतून विकला जाईल. भारत तांदूळ फिरत्या व्हॅन आणि तीन केंद्रीय सहकारी संस्थांच्या दुकानात खरेदीसाठी उपलब्ध असेल आणि लवकरच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह इतर किरकोळ साखळीद्वारे देखील उपलब्ध होईल.

या खरीपात चांगले पीक, एफसीआय कडे पुरेसा साठा आणि तांदूळ निर्यातीवर विविध नियम असूनही तांदळाच्या देशांतर्गत किमती वाढत आहेत. किरकोळ किमती गेल्या वर्षभरात १४.५१% वाढल्या आहेत. तांदळाच्या किमती आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात सरकारने यापूर्वीच विविध पावले उचलली आहेत.

एफसीआय अर्थात भारतीय खाद्यान्न महामंडळाकडे चांगल्या दर्जाच्या तांदळाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे जो ओएमएसएस अंतर्गत व्यापारी/घाऊक विक्रेत्यांना २९ रु/किलो च्या राखीव किमतीवर दिला जात आहे. खुल्या बाजारात तांदळाची विक्री वाढवण्यासाठी, केंद्र सरकारने तांदळाची राखीव किंमत ३,१०० रु./- क्विंटल वरून २,९००रु./- क्विंटल पर्यंत कमी केली आहे आणि तांदळाचे किमान आणि कमाल प्रमाण अनुक्रमे १ मेट्रिक टन आणि २,००० मेट्रिक टन करण्यात आले आहे.

या व्यतिरिक्त, एफसीआय प्रादेशिक कार्यालयांद्वारे व्यापक प्रसारासाठी नियमित प्रसिद्धी केली जाते. त्यामुळे हळूहळू तांदळाची विक्री वाढली आहे. दि. ३१.०१.२०२४ पर्यंत, १.६६ लाख मेट्रिक टन तांदळाची खुल्या बाजारात विक्री झाली जी तांदळासाठी ओएमएसएस (डी) अंतर्गत कोणत्याही वर्षातील सर्वाधिक विक्री आहे.

टॅग्स :भातबाजारकेंद्र सरकारसरकारखरीप